मार्केटिंग प्रोफेशनल म्हणून तुमच्याकडे असायलाच हवीत ही 10 कौशल्ये
14 minuteRead
 
                                    
                                
(You can read this Blog in English here)
तुम्ही ती म्हण नक्कीच ऐकली असेल, "जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन." खरे तर ती म्हण अपूर्ण आहे. आश्चर्य वाटले? मला सुद्धा आश्चर्य वाटले होते, जेव्हा मी पहिल्यांदा पूर्ण म्हण ऐकली. मूळ पूर्ण म्हण अशी आहे "अ जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन, बट समटाईम्स बेटर दॅन अ मास्टर ऑफ वन." ती खरे तर बहुगुणी, जुळवून घेणारी आणि चैतन्यपूर्ण व्यक्ती असल्याबद्दलचे कौतुक करणारी म्हण आहे. मला असे वाटते की ती मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे वर्णन करते. कारण त्यांना मार्केटिंग प्रोफेशनल बनण्यासाठी नेमक्या ह्याच गुणांची आवश्यकता असते. मी असे का म्हणतेय याचे कारण मला तुम्हाला सांगू द्या. श्री. जो चेरनॉव्ह (मुख्य मार्केटिंग ऑफिसर, Pendo.io) यांनी मार्केटिंग म्हणजे नक्की काय हे खूप उत्तम प्रकारे समजावून सांगितले आहे.
"चांगल्या मार्केटिंगमुळे कंपनीला एक स्मार्ट लुक मिळतो. आणि उत्कृष्ट मार्केटिंगमुळे ग्राहकाला आपण स्मार्ट आहोत असे वाटते."
कुठलाही बिझनेस फक्त एका ग्राहकाच्या जोरावर चालू शकत नाही, बरोबर? ग्राहक मोठ्या संख्येत असतात आणि संभाव्य ग्राहक तर आणखी मोठ्या संख्येत असतात. प्रत्येक ग्राहक वेगळा असतो आणि त्यांची मानसिकता, मते, वागण्याच्या पद्धती आणि विचारसरणी वेगवेगळ्या असतात.
म्हणून, ग्राहकांना ते स्मार्ट आहेत असे वाटायला लावेल असे उत्तम दर्जाचे मार्केटिंग जर करायचे असेल, तर श्री. जो म्हणाले त्याप्रमाणे, मार्केटिंग प्रोफेशनलने ‘जॅक ऑफ मेनी ट्रेड्स’ म्हणजे बहुगुणी, अष्टपैलू असायलाच हवे. जी व्यक्ती बहुगुणी असते ती उदारमतवादी असते आणि तिला अनेक गोष्टींचे ज्ञान असते. तिला विविध प्रकारचा आणि उपयुक्त असा अनुभव असतो. ही जी अनेक कौशल्ये ती व्यक्ती आत्मसात करत असते त्यामुळे तिचे अशा एका माणसात परिवर्तन होते जे माणूस ग्राहकांना अचूकपणे समजून घेऊ शकते, त्यांचा अभ्यास करू शकते आणि त्यामुळे एक सखोल परिणाम साधला जातो.
अत्यंत काळजीपूर्वक पडताळणी करून मी आजकालच्या काळात उत्तम मार्केटिंग प्रोफेशनल बनता यावे म्हणून दहा आवश्यक कौशल्ये खाली शॉर्टलिस्ट केली आहेत. या दहा कौशल्यांमध्ये प्राविण्य मिळवणे आवश्यक का आहे हेसुद्धा मी स्पष्ट करून सांगेन.
1.अनालिटिक्स
या कौशल्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. मार्केटिंगच्या क्षेत्रात अनालिटिक्स खूप प्रकारे उपयुक्त असते. तुमच्या मार्केटिंग कॅम्पेन्सचा प्रभावीपणा आणि त्यावर तुम्हाला किती परतावा मिळतो हे मोजून पाहण्यासाठी, त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. लीड्स मिळवण्यासाठीचे ते एक मुख्य साधन आहे. अनालिटिक्स हे एक असे साधन आहे जे तुम्हाला अभ्यासपूर्ण डेटा पडताळून पाहिल्यावर योग्य ते निर्णय घेण्यामध्ये मदत करू शकते.
आपण आता अशा काळात आहोत जेव्हा बिझनेसेस हे तंत्रज्ञानाने चालतात. एक मार्केटर म्हणून तुम्ही हे समजून घेणे खूपच महत्वाचे आहे. अनालिटिक्समुळे आपल्याला अनेक टेक टूल्स (तंत्रज्ञान साधने) लाभली आहेत जी तुम्हाला तुमच्या बिझनेसवर परतावा देत राहतात. तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की तुमच्या अनालिटिक्सच्या गरजेसाठी योग्य ते टेक टूल तुम्हाला शोधायचे आहे आणि मग तुमचे काम झाले. ही टूल्स तुम्हाला तुमचा नफा, कार्यक्षमता आणि पोर्टफोलिओ यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यात मदत करतील. असे असले तरी, खरे आव्हान योग्य ते टूल निवडण्यात आहे कारण मार्केटमध्ये सध्या अगणित टूल्स उपलब्ध आहेत. तुमच्या बिझनेससाठी जे उपयुक्त ठरेल त्या आदर्श अशा टूलमध्ये गुंतवणूक करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.

- संवाद
तुम्हाला हा पर्याय थोडा घिसापीटा वाटेल किंवा यात काहीच नवीन नाही असे वाटेल. असे असले तरी मला माझ्या टॉप टेन कौशल्यांमध्ये याचा उल्लेख करावाच लागेल. मार्केटर म्हणून तुमची प्राथमिक आणि महत्वाची भूमिका असली पाहिजे संवाद साधण्याची. ग्राहक, जनता, मॅनेजमेंट बोर्ड आणि तुमच्या कंपनीमधल्या इतर अनेक अंतर्गत टीम्स यांच्याशी संवाद साधला गेला पाहिजे. मार्केटिंग प्रोफेशनलचे काम आहे शक्तिशाली असा प्रभाव टाकणे. फक्त कॅम्पेन्स, धोरणे आणि निर्णय घेण्याच्या कौशल्यांनीच नव्हे तर आपल्या संवाद साधण्याच्या पद्धतीने देखील. तुमची लिखित आणि तोंडी संवाद साधण्याची पद्धत देखील अत्यंत प्रभावी असलीच पाहिजे. मार्केटर हा कोणत्याही ब्रँडचा एकूणच कम्युनिकेटर (संवाद साधणारा) असतो, त्यामुळे कोणत्याही मार्केटिंग प्रोफेशनलसाठी हे कौशल्य न टाळता येण्यासारखेच आहे.

- सोशल मीडिया मॅनेजमेंट कौशल्य
तुम्ही जर 'मिलेनियल्स' साठी प्रोफेशनल मार्केटिंग करत असाल तर तुमच्या सी.व्ही.वर उल्लेख असलेले हे सर्वात खास कौशल्य असेल. हबस्पॉटच्या आकडेवारीनुसार, ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी 92% हून अधिक मार्केटर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर करतात. यातली मेख अशी आहे की तुम्ही फक्त एकाच नाही तर प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये निपुण असणे आवश्यक असते. आजकाल अगणित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत आणि आणखीनही अनेक नवनवीन प्लॅटफॉर्म्स येत आहेत, म्हणून तुमचे काम आहे की प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या अल्गोरिदमबाबत अपडेट राहणे. याचा अर्थ असा होतो की तुम्ही कॉपीरायटिंगमध्ये सुद्धा माहीर असले पाहिजे.

- गोष्ट सांगण्याची कला
बिल गेट्स योग्यच म्हणाले आहेत, "कॉन्टेन्ट हाच खरा राजा आहे." कॉन्टेन्ट मॅनेजमेंट हा आजकाल उदयाला आलेला एक ट्रेंड आहे आणि त्याला बरीच लोकप्रियता मिळते आहे. मार्केटिंग प्रोफेशनल म्हणून तुमची जबाबदारी आहे हे ठरवणे की तुमची कंपनी किंवा ब्रँड कोणत्या प्रकारचे कॉन्टेन्ट प्रसारित करेल. त्यापैकी कोणते कॉन्टेन्ट चालेल आणि कोणते चालणार नाही हे ठरवण्यासाठी तुम्ही कॉन्टेन्ट मॅनेजमेंट आणि कॉन्टेन्ट मार्केटिंगमध्ये कुशल असले पाहिजे. कॉन्टेन्टचा गेम उत्कृष्टरीत्या खेळण्यासाठी तुम्हाला गोष्ट सांगू शकण्याची कला चांगली अवगत असायला हवी.
‘लिंक्ड इन’च्या एका सर्वेक्षणानुसार सर्व मार्केटर्सपैकी 8% मार्केटर्सच्या प्रोफाइलवर गोष्ट सांगण्याची कला (स्टोरीटेलिंग) हे कौशल्य नमूद केलेले आहे. मार्केटरचे काम आहे डेटा आणि अॅनॅलिटिक्स घेणे आणि कंपनीची खरी भूमिका काय आहे याबद्दलच्या खऱ्या गोष्टी सांगणे. इथे महत्वाचे असते तुमचे प्रॉडक्ट किंवा सेवा संभाव्य ग्राहकांसाठी त्यांना ओळखीच्या वाटणाऱ्या आणि त्यांना भावनिक पातळीवर आवडणाऱ्या अशा बनवणे. ब्लॉगवरचे मटिरियल, प्रायोजित केलेल्या सोशल मीडिया पोस्ट्स आणि ई-बुक्सच्या बाबतीत सुद्धा हे बऱ्याचदा केले जाते.

- वेळेचे व्यवस्थापन
हे कौशल्य तर कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये आवश्यक असते हे उघडच आहे. एका मार्केटरसाठी ते खूपच जास्त महत्वाचे असते. कारण त्याच्या कार्यक्षेत्राचा आवाका खूप मोठा असतो. एक मार्केटर म्हणून तुम्ही अनेक प्रकारच्या भूमिका निभावणार असता. वेळेच्या व्यवस्थापनात कौशल्य या गोष्टीत असते की तुम्ही तुमचा वेळ कुठे, कधी आणि किती प्रमाणात गुंतवता. तुम्ही कशाला आणि किती प्राधान्य देता. विशेषतः अडचणीच्या काळात. वेळेचे व्यवस्थापन सहसा सोपे आहे असे मानले जाते, पण ते तसे नसते.

- सर्च एंजिन ऑप्टिमायझेशन
सर्च एंजिनच्या रिझल्ट पेजेसवर वेबसाईट पेजेसचे स्थान ऑरगॅनिक पद्धतीने ठरवणे याला एस.ई.ओ. असे म्हणतात. तुम्ही जर पहिल्या तीन SERP रिझल्ट्स मध्ये आलात तर तुम्हाला बरेच 'ट्रॅफिक' मिळू शकते. सरासरीने, ‘Backlinko’ च्या अनुसार, पहिल्या नंबरच्या रिझल्टवर 31.7 टक्के वेळा क्लिक केले जाते. तुम्ही जर संबंधित 'कीवर्ड्स'नुसार रँकिंग केलेत तर तुमचे प्रॉडक्ट घेण्यासाठी आतुर ग्राहकांची रांगच तुमच्याकडे लागेल. यानंतर हे कौशल्य किती महत्वाचे आहे हे आणखी स्पष्ट करून सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.

- ग्राफिक डिझायनर
हो, तुम्ही बरोबर वाचलेत! एक तज्ज्ञ मार्केटिंग प्रोफेशनल म्हणून तुम्ही UX डिझायनिंगची काही मूलभूत तत्त्वे शिकून घेतली पाहिजेत. तुम्हाला हे कौशल्य अवगत असले पाहिजे कारण मग तुम्ही ठरवू शकता की तुमची मार्केटिंगची धोरणे (जसे की सोशल मीडिया पोस्ट, बॅनर्स, ऎड्स, वेबसाईट, मोबाईल अप्लिकेशन इत्यादी) युझरना आवडतील अशी आहेत की नाही. डिझायनिंगचे योग्य ज्ञान असणे ही गोष्ट पूर्ण चित्रच बदलून टाकते. आजकालच्या जमान्यात, तुमच्या वेबसाईट्स आणि सोशल मीडिया हॅण्डल्स हे ग्राहकांसाठी जणू तुमचे फर्स्ट इम्प्रेशन असते. म्हणून कॉन्टेन्ट हे युझर्सना पसंत पडेल असे आणि नजरेला सुखावेल असे असले पाहिजे.

- उत्तम नेटवर्किंग कौशल्य किंवा लोकांशी संवाद साधण्याचे कौशल्य
मार्केटिंग प्रोफेशनल हा त्याच्या ब्रँडचा एक प्रतिनिधी असतो आणि तो तसा फक्त ग्राहकांसमोरच नाही तर त्या ब्रँडशी संबंधित इतर लोकांसमोरही असतो. ब्रँडशी जोडले गेलेले इन्फ्लुएन्सर्स, सोशल मीडियाची हाताळणी, संबंधित क्षेत्रातील लोकांशी संबंध आणि इतर अनेक तऱ्हांनी ब्रँड आणि त्याचे भागधारक यामधला दुवा बनण्याचे काम मार्केटर करत असतो. नेतृत्वाचे गुण सुद्धा अत्यंत चांगले परिणाम साधून देतात. म्हणून तुमच्या सी.व्ही. वर नेटवर्किंग हे असलेच पाहिजे.

- रिसर्च आणि डेटा अनालिसिस
मार्केटिंग हे रिसर्चच्या आधारावर चालते. क्लायंट्स असोत, मार्केटिंग टूल्स असोत, इन्फ्लुएन्सर्स, स्पर्धा, प्रॉडक्ट आयडीयाज असोत किंवा इतर काहीही असो सर्वात आधी नेहमीच रिसर्च असतो. तुमची ध्येये पूर्ण करण्यासाठी तुम्ही अभ्यास केला पाहिजे, धोरणे ठरवली पाहिजेत आणि प्रभावी पद्धतीने कॅम्पेन्सची आखणी केली पाहिजे.
मार्केटिंग मधली एक मूलभूत गोष्ट ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष नाही केले पाहिजे ती म्हणजे डेटा अनालिसिस. तुमच्याकडे जरी मार्केटिंगच्या बाबतीतले उत्तम टॅलेंट असले, तरी तुमच्याकडे डेटा अनालिसिस करण्याचे कौशल्य नसले तर कोणती टेक्निक्स प्रभावी ठरतील आणि कोणती नाही हे ठरवणे कठीण जाईल.

- डिजिटल मार्केटिंग
डिजिटल मार्केटिंग या विषयाचा आवाका फार मोठा आहे. इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसच्या साहाय्याने किंवा इंटरनेटवर केले जाणारे सर्व मार्केटिंग यासाठी डिजिटल मार्केटिंग ही संज्ञा आहे. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत डिजिटल मार्केटिंगच्या साहाय्याने तुम्हाला अधिक मोठ्या संख्येच्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचता येते आणि तुमचे प्रॉडक्ट किंवा सेवा घेणारे जे सर्वात जास्त संभाव्य असे लोक आहेत अशा लोकांना तुम्ही टार्गेट करू शकता. तसेच पारंपरिक ऎड्वर्टायझिंगच्या तुलनेत ते सहसा कमी खर्चाचे असते. मार्केटिंग प्रोफेशनल्स बनू इच्छिणाऱ्या सर्वांना मी अशा शुभेच्छा देते की तुम्ही वर उल्लेख केलेल्या सर्व स्किल्सचे 'जॅक' व्हाल आणि मार्केटिंगचे 'मास्टर' बनाल.
अनुवाद: अन्योक्ती वाडेकर Translated by Anyokti Wadekar
Write, Record and Answer! Consume Unlimited Content! All you need to do is sign in and its absolutely free!
Continue with one click!!By signing up, you agree to our Terms and Conditions and Privacy Policy.
 
                


 
                                 
                                     
                                     
                                     
                                     
                                    