सेल्फ-केर च्या महत्त्वायच्या ७ टिप्स

8 minute
Read

Highlights

महागड्या स्पाला न जात स्वतःची काळजी उत्तम पद्धतीने कशी घेतली जाते, हे आज समजून घेऊया -

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

सेल्फ-केर हे शब्द कानावर पडले तर आपल्या मनात येतात महागडे, सुगंधी स्पा आणि सेंटेड कॅण्डल्स ने भरलेले बाथरूम, आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेले बाथटब. ह्याला सेल्फ-केर म्हणतात का? हो आणि नाही. हो, कारण स्पा किंवा कॅण्डल्स काही जणींसाठी सेल्फ-केर रूटीनचा महत्वाचा भाग असू शकतो. आणि नाही, कारण एका स्पा मध्ये सेल्फ-केर थांबत नाही. सेल्फ-केर त्याच्या पलीकडे जाते.

आज आपण जाणून घेऊया अशाच काही सेल्फ-केर चा महत्वाच्या गोष्टी, ज्या कुणी पटकन शेर करत नाही. यात तुम्हाला काही महागडे बॉडी वॉश किंवा कॅण्डल्स विकत घेण्याची गरज नाही. अगदी साधे, सरळ उपाय ज्याने तुम्हाला खूप छान वाटेल आणि आपण खरीच स्वतः ची काळजी घेत आहोत, याची खात्री वाटेल.

तर चला, जाणून घेऊया सेल्फ-केर चे रुटीन.

१. आपल्या आवडीच्या छंदांसाठी वेळ द्या. 🎧🎨🎯

तुमचा कोणता छंद आहे का? सर्वानाच असतो, पण त्यासाठी आपण वेळ देत नाही. आपण खूप वेळ फेसबुक किंवा सोशल मीडिया मध्ये घालवतो आणि आपल्याला समजतच नाही कि किती वेळ वाया गेला आहे.आपल्याला जाणवते कि मीडियावरच्या गोष्टी पाहून आपण अजूनच लो फील करत आहोत.

म्हणून, आम्ही असे सुचवतो कि फोन बाजूला ठेवा आणि त्यापेक्षा आपल्या हरवलेल्या छंदासाठी वेळ द्या. मग ते वाचन असू शकते, संगीत ऐकणे किंवा नवीन भाषा शिकणे. छंदाला व्यवसायामध्ये बदलू नका. त्याला छंदच राहू दे, म्हणजे तुम्हाला त्याचा मनसोक्त आनंद घेता येईल आणि पैशाच्या गोष्टींचा विचार मनात येणार नाही. स्ट्रेस कमी होईल, आणि स्वतःला वेळ देता, याचे समाधान वाटेल.

२. जर्नलिन्ग करा. 📝

आपल्या मनात रोज असंख्य विचार येत असतात - काही चांगले, काही नेगेटिव्ह, काही नुसतेच विचार आणि आठवणी असतात. यातल्या काही विचारांचा किंवा आठवणींचा आपल्याला खूप त्रास होतो. असे वाटते कि आपण आपल्या मनात एखादा बुद्धिबळाचा डाव रचला आहे. तर अशा विचारांसाठी, तुम्ही जर्नलिन्ग करू शकता. जर्नलिन्ग आणि डायरी लिहिण्यात बराच फरक आहे. जर्नलिन्ग मध्ये तुम्ही तुमच्या मनातील सर्व विचार लिहून काढता आणि त्यावर चिंतनशील लेखन करता. जसे तुम्ही 'फ्लो' मध्ये येता, तुम्हाला जाणवते कि काही तुम्ही उगाच काही गोष्टींचा विचार करत आहात. हळूहळू, तुम्हीच मनाला समजावता कि, चिंता करण्यात किंवा अतिविचार करण्यात काहीच अर्थ नाही.

तुम्ही जर्नलिन्ग आठवड्यातून एकदा किंवा तुम्ही खूप विचार करून अस्वस्थ असाल तेव्हा करू शकता. त्यावर काही बंधन नाही. फक्त आपले मन मोकळे करा आणि लिहा.

३. हेल्दी स्नॅक्स चे सेवन करा. 🍉🥕🥗

कधीकधी पाणीपुरी खाणे किंवा आईस्क्रिम खाणे एकाद्या स्ट्रेस- बस्टर चे काम करते आणि तुम्हाला खूप छान वाटते. पण जर तुम्ही रोजच अशा फास्ट फूड स्नॅक्स खात असाल, तर त्याने तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थावर परिणाम होऊ शकेल. हो, मानसिक स्वास्थ सुद्धा अशा खाण्याने बिघडू शकतं. संशोधनाच्या अनुसार मीठ, मैदा, मसाले आणि साखर यांच्या अतिसेवनाने आपण खूप लो आणि क्रेंकी फील करू शकतो. गॅस, ऍसिडिटी होऊ शकते आणि आपण मनाने अस्वस्थ होतो. पण जेव्हा आपण हेल्दी म्हणजे अँटी-ऑक्सिडंट्सने युक्त अशा फळांचे आणि स्नॅक्स चे सेवन करतो. तेव्हा आपण हलके फील करतो.

म्हणून संध्याकाळी स्नॅक्स खाण्याचे मन झाले तर एखादं फ्रुट खा, सुकामेवा सोबत ठेवा, चणे-शेंगदाणा खा किंवा मोड आलेले कडधान्य खा. तेव्हा तुम्ही तुमची काळजी घेत असाल, लक्षात ठेवा.

४. 'नाही' म्हणायला शिका. 🇳🇴👎

'अगं, कार्यक्रमाला यायलाच पाहिजे ह? नाही आलीस तर बघ!" असं कुणीतरी म्हणतं आणि आपण मनात नसले किंवा वेळ नसला, तरी संपूर्ण मेहनत करून त्या कार्यक्रमाला जातो. आणि आपल्याला लक्षात येते कि किती थकवा आला आहे, घरचे काम राहिले आहे, आणि कार्यक्रमाला एखादी रँडम व्यक्ती आपल्याला वजनावरून काहीतरी म्हणाली! आता स्पा ला जाण्याऐवजी आपण जर कार्यक्रमालाच गेलो नसतो तर किती बरे झाले असते, असे वाटते.

म्हणून 'नाही' म्हणायला शिका. आपले सेल्फ-केर चे इतर कुणापेक्षाही महत्वाचे नाही. कुणी कितीही आग्रह केला तरी आपण बळी पडायचे नाही, लक्षात घ्या. दयाऱ्या व्यक्तीला राग येणार नाही, असे उत्तर द्या आणि सेल्फ-केर करा.

५. ब्रेक घ्या (पण फोन ब्रेक नाही हं). 🌈👨‍👩‍👧‍👦

आठवडा भर आपण काम करत राहतो, मग वीकएंड एखाद्या हिल स्टेशन किंवा स्टकेशन ला जाण्यात हरकत नाही. तसेच, दिवसभरातून पण ब्रेक घेत जा. सतत स्क्रीन समोर बसून काम करणे किंवा एकच काम सतत करणे, याने खूप स्ट्रेस होतो आणि तुम्ही कितीहि महागड्या स्पा ला गेलात तरी तो थकवा जात नाही. म्हणून ब्रेक घेत जा. पण काही मुली आणि महिला ब्रेक म्हणून फोन हातात घेतात आणि मग चालू होते ते रील्स आणि इंस्टाग्रामचे मॅरेथॉन. फोन वर फोटोस किंवा व्हिडिओस बघण्याला आपण ब्रेक म्हणून शकत नाही. यांनी तर तुम्हाला अजूनच थकवा येईल आणि डोळ्यांना आणि मानेला त्रास होईल.

म्हणून ब्रेक घेताना आपण फोन हातात धरणार नाही, याची खबरदारी घ्या. वॉकला जा, फ्रेइंड्स सोबत बोला, स्ट्रेचिंग करा, किंवा डोळे मिटून शांत बस. बघा, किती मस्त वाटतं ते!

६. फायनान्शियल ऑडिट करा. 📈

बँक पासबुक, स्टेटमेंट, किंवा क्रेडिट कार्ड स्टेटमेंट्स पाहिले तरी स्ट्रेस होतो. मग यात सेल्फ-केर कसं होईल, असं प्रश्न तुम्हाला पडला असेल. उत्तर आम्ही देतो. सेल्फ-केर म्हणजे स्वतःची काळजी घेणे आणि त्यात आपल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेणं, हि एक महत्वाची पायरी बनते. जेव्हा आपले फायनॅन्सस विस्कटलेले असतात, तेव्हा आपले मन सुद्धा विचलित होते. म्हणून थोडा वेळ काढून आपले फायनान्शियल ऑडिट करा आणि बजेटिंग करा. जेव्हा आर्थिक परिस्थिती नीट असेल, तेव्हा तुम्हाला मनापासून स्ट्रेस-फ्री वाटेल. आपले पॆसे कुठे जातात आणि कसे वाचवता येतील, याचा नीट विचार करा आणि आपल्या आर्थिक स्थितीची काळजी घ्या.

७. रोज रात्री जेवणानंतर फोनपासून लांब रहा. 📵

खरंतर, काही महिला जेवण झाल्यानंतर फोन चेक करतात, आणि तेव्हाच सुरु होते रील्स बघण्याचे काम किंवा मेम्स बघण्याचे सत्र. पण डॉक्टर्सनि सांगितले आहे कि महिलांनी जर रात्रीच्यावेळी फोन जास्त वापरला, तर त्याच्या रेडिएशन ने महिल्यांच्या अवयवांवर घातक परिणाम होऊ शकतो, निद्रानाश, डिप्रेशन, एन्झायटी या सर्व गोष्टींचा त्रास होऊ शकतो. म्हणून जेवण झाले, कि फोन लांब ठेवा आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा.

तर स्पाला न जाता तुम्हाला सेल्फ-केर करता येईल आणि मनापासून छान वाटेल. वरील दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा आणि स्वतःची काळजी घ्या. 🤗

Logged in user's profile picture

मी दररोज स्वत: ची काळजी कशी सुरू करू?
चला, जाणून घेऊया सेल्फ-केर चे रुटीन.

आपल्या आवडीच्या छंदांसाठी वेळ द्या.

जर्नलिन्ग करा.

हेल्दी स्नॅक्स चे सेवन करा

'नाही' म्हणायला शिका.

ब्रेक घ्या (पण फोन ब्रेक नाही हं)

फायनान्शियल ऑडिट करा

रोज रात्री जेवणानंतर फोनपासून लांब रहा