फादर्स डे स्पेशल - या ७ पद्धतीने करा आपल्या बाबाना सर्प्राईस
8 minuteRead
 
                                    
                                
फादर्स डे जवळ आला आहे आणि अजून काहीच प्लॅन नाही का? मग हे वाचा -
मग, या वर्षीचा फादर्स डेचा काही प्लॅन आहे का? ओह, विसरलात तर नाही ना! आणि जर काय प्लॅन करायचा किंवा बाबांना सरप्राईझ कसे करायचे हे समजत नसेल, तर मग चिंता करू नका. आम्ही आहोत ना, तुमच्या मद्गतीसाठी. आमच्याकडे काही मस्त आयडियास आहेत ज्याने तुम्ही या फादर्स डेला आपल्या बाबांना छान सरप्राईझ देऊ शकता.
तुमच्या आयुष्यामध्ये आईबाबांचा खुप मोठा वाटा आहे. आई जेव्हा आपल्याला माया लावते, तेव्हा बाबासुद्धा आपली माया लावतात. काही वडील खूप शिस्तप्रिय असतात, पण ते मुलींच्या भल्यासाठीच. काही वडील तर मुलींचे बेस्ट फ्रेंड्स बनून जातात, ‘पापा कि परी’ म्हणा ना! आणि काही वडील त्यांच्या ऑफिस आणि बिझनेस मध्ये खूप व्यस्त असतात, पण आपल्या लेकीचा ऍन्युअल डेचा डान्स मिस करत नाही हं.
मग चला तयारी करूया एका छान, सर्प्राईसची आणि आपल्या अशाच शिस्तप्रिय पण मानाने मऊ अशा बाबांचा फादर्स डे सेलिब्रेट करूया.
१. हाऊस पार्टी प्लॅन करा आणि त्यांच्या मित्रांना बोलवा. 👴🥳
जर तुमचे बाबा बरेच दिवस किंवा महिने आपल्या जिवलग मित्रांना भेटले नसतील, तर त्यांना बोलावून एक सर्प्राईस पार्टी प्लॅन करण्यात हरकत नाही. कुठला हॉल बुक करण्याची गरज नाही. घरातच पार्टी करा ना. तुमच्या घरातलाच हॉल सजवा, जर वेळ हातात कमी असेल तर स्नॅक्स आणि ड्रिंक्स ऑर्डर करा आणि महत्वाचे म्हणजे, बाबांच्या मित्रांना इन्व्हाईट करा, तुमच्या नाही. या पद्धतीने तुम्ही बाबांच्या मित्रांचा सुद्धा फादर्स डे प्लॅन करत आहात.
जर तुमचे बाबा त्यांच्या फ्रेंड्स ना मिस करत असतील, तर मग त्यांना या पार्टी ची कल्पना खूप आवडेल. ते गप्पांमध्ये रमतील पण तुम्हाला मनापासून थँक्स म्हणतील.
हाऊस पार्टी च्या स्नॅक्स ऑर्डर करण्याच्या वेळी लक्षात असू द्या कि ते जास्त अनहेल्दी नको. जर तुमच्या बाबांना किंवा त्यांच्या मित्रांना डायबेटिस, ब्लड प्रेशर सारखे आजार असतील, तर पौष्टिक स्नॅक्स ऑर्डर करण्याचा प्रयत्न करा. काही साधे, सोपे गेम्स सुद्धा प्लॅन करू शकता पण त्यांना गप्पा मारता येतील याची काळजी करा. लक्षात असू द्या कि हि तुमची पार्टी नाही, बाबांची पार्टी आहे. लेट हि बी द किंग ऑफ द डे.
२. विचार करून छान उपयोगी असे गिफ्ट द्या. 🎁
तुमचे बाबा फिटनेस-क्रेझी आहेत का? कि त्यांना जुनी गाणी ऐकायला आवडतात का? ते आपल्या तब्येतीची जास्त काळजी घेतात का? किंवा मग त्यांचा फोन खुप जुना झाला आहे आणि ते नवीन फोन विकत घेण्याचे टाळत आहेत? मग या फादर्स डे ला आपल्या बाबांना काय द्यायचे हे समजलेच असेल.
गिफ्ट शॉप मधून एखादा कॉफी मग किंवा मूर्ती किंवा घड्याळ देण्याऐवजी आपल्या वडिलांच्या आवडीनिवडी जाणून घ्या. त्यांना सध्या काय करायला आवडते, आणि मग त्यानुसार गिफ्ट खरेदी करा. जर त्यांना गाणी ऐकायला आवडतात, तर तुम्ही त्यांना स्पीकर देऊ शकता. जर त्यांनी आपली तब्येत मनावर घेतली असेल, तर जिम चे प्लॅन्स, किंवा ट्रॅकपँट आणि टी-शर्ट सेट देऊ शकता. ऑपशन्स भरपूर आहेत, पण शोधणे हि तुमची जबाबदारी आहे.
जेव्हा तुम्ही त्यांचा विचार करून गिफ्ट द्याल तेव्हा त्यांना नक्कीच आपल्या लाडक्या लेकीचे कौतुक वाटेल. आपल्या लेकीने लक्षात ठेवून गिफ्ट आणले, याचा आनंद होईल.
३. पत्र लिहा किंवा विडिओ पाठवा. ✉️📹
ग्रीटिंग कार्ड तर नेहिमीच आपण देतो, पण जर तुम्ही विचार करून पत्र लिहिले तर बाबांना अजून छान वाटेल. ग्रीटिंग कार्ड मधील संदेश लिहिलेला असतो, त्यात भावना नसतात. पण जेव्हा तुम्ही पत्र लिहिता, तेव्हा तुम्ही जास्त मोकळेपणाने विचार व्यक्त करू शकता. म्हणजे तुमचा आणि तुमच्या बाबांचा जीवन प्रवास, त्यांनी तुम्हाला कधी प्रोत्साहित केले, नेहमी तुमच्या करिअर आणि आवडींना चालना दिली, शिस्तप्रिय राहिले पण ते तुमच्या चांगल्यासाठीच. एखादा भावनिक प्रसंग आठवत असेल, तर नक्कीच लिहा.
थोडे भावनिक होईल, पण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठीच तर आपण हा पिता दिवस साजरा करत आहोत.
जर तुम्ही घरापासून लांब आहात, मग विडिओ कॉल करण्याऐवजी विडिओ रेकॉर्ड करून पाठवा. बघा किती फरक पडतो ते!
४. त्यांना तुमचा थोडा वेळ द्या. ⏳
बाबा नेहमी म्हणतात का - आमच्या लेकीकडे बाबांशी बोलायचं वेळच नसतो. जॉब, नाहीतर ऑफिस, आणि ते नसेल तर मोबाईल. मग फादर्स डेचा संपूर्ण दिवस त्यांच्या साठी बाजूला ठेवा. जर पूर्ण दिवस शक्य नसेल, तर संध्याकाळी दुसरा कुठलाच बेत आखू नका. बाबांकडे जा आणि हक्काने म्हणा, "चला बाबा, टाइम फॉर ए मूवी." चित्रपटाला जायचे नसेल तर तुम्ही एखाद्या रेस्टॉरंट मध्ये घेऊन जा पण बिल हे तुमच्या अकाउंट मधून डेबिट व्हायला हवे. त्यांच्यासोबत गप्पा मारा, ऑफिस मध्ये काय चालू आहे ते सांगा, काही धमालीच्या गोष्टी शेर करा. बाबांना पण तुम्हाला काही सांगायचे असेल तर ऐकून घ्या. मग ती एखादी गम्मत असेल नाहीतर लेक्चर सुद्धा असू शकते. आज बाबांचा दिवस तर मग तुम्हाला ते शांतपणे, न कुरकुर करता ऐकणे गरचेचे आहे.
५. बाबांच्या आवडीचे पदार्थ बनवा. 👩🍳
फादर्स डे आहे न? मग त्यांच्या आवडीचा जेवणाचा बेत बनवा. त्यांना आवडेल कि इतकी वर्षे झाली तरी तुम्ही त्यांच्या आवडी विसरला नाहीत.
पण जेवण बनवायला जमत नसेल, तर वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही जेवण ऑर्डर करा, पण एक पदार्थ तुमच्या हाताने बनवा, जो पदार्थ तुमच्या वडिलांना मनापासून आवडतो.
म्हणजे लेकीने नुसते ऑनलाईन जेवण मागवले नाही, तर स्वतः हून पण एक आवडीचा पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केला.
६. पर्सनलाईझ्ड भेट द्या. 💝
ओह, म्हणजे फादर्स डे लवकरच येत आहे, हे तुम्हाला आजच समजले का आणि काही विशिष्ट सरप्राईझ करण्यासाठी वेळ नाही का? मग पर्सनलाईझ्ड गिफ्ट, हा एक छान पर्याय आहे. कॉफी मग द्यायचा असेल, तर मग बाबांचा आणि तुमचा फोटो प्रिंट करून गिफ्ट द्या. आजकाल बरेच ऑनलाईन साईट्स वर तुम्हाला हे गिफ्ट्स बघायला मिळतील. अगदी ३-४ दिवसांमध्ये हे गिफ्ट्स घरपोच मिळतात. लाकडी मेडल्स, फ्रेम्स, आणि अवॉर्ड्स असे पण तुम्ही बाबांना देऊ शकता.
नुसतेच गिफ्ट देण्यापेक्षा, ते पर्सनलाईझ्ड केले तर अजून प्रभावी वाटते.
७. बाबांची खोली सजवा. 🎍
तुम्ही तुमच्या खोली सजवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे का? छान, सुंदर ऍमेझॉन कडून डेकॉर पिसेस आणि आयकिया च्या फर्निचर ने तुमची रूम खूप परफेक्ट दिसते. मग या फादर्स डेला त्यांची रूम सजवण्याचा निश्चय करा. त्यांना एखाद्या मूवी ला किंवा मम्मीसोबत बाहेर पाठवा, आणि त्या वेळेत तुम्ही त्यांची रूम सजवून घ्या.
हो, पण त्याआधी तुम्हाला थोडी खरेदी करावी लागेल, लक्षात असू द्या कि डेकॉर आणि सर्व गोष्टी हे त्यांच्या आवडीनुसार करा, तुमच्या नाही. आणि मम्मीला हि विचारायला विसरू नका.
तर या फादर्स डे ला सर्प्राईस करायच्या कल्पना कशा वाटल्या? आवडल्या ना! कोणतीही एक कल्पना निवडा आणि तयारी सुरु करा.
Write, Record and Answer! Consume Unlimited Content! All you need to do is sign in and its absolutely free!
Continue with one click!!By signing up, you agree to our Terms and Conditions and Privacy Policy.
 
                


 
                                 
                                     
                                     
                                     
                                     
                                    