आई, तू आहेस अद्वितीय

7 minute
Read

Highlights

आई किती अद्वितीय असू शकते, हे जाणून घेऊया या मदर्स डायचा छोट्या कथांमधून -



Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

आई हा शब्द उच्चरताच आपल्या डोळ्यासमोर उभी राहते, ती एक प्रेमळ व्यक्ती जी आपल्यावर जीवापाड प्रेम करते. 'अनकंडिशनल लव्ह' जर कोणाला समजून घ्यायचं असेल, तर ते फक्त आईचच प्रेम असू शकते. पण आई म्हणजे सहावारी नेसलेली, मध्यमवयीन, विवाहित महिला डोळ्यासमोर येते का? जर अशी व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर आली असेल, काही हरकत नाही. कारण आज आपण भेटूया अशा काही माउलींना ज्या अद्वितीय आहेत. काही परिस्थितीमुळे आई बनल्या, तर काही आईची भूमिका करत आहेत. तर काही आपल्या निर्णयाने आई बनल्या आहेत.

सुरु करूया.

१. अनुया आहे एक गृहिणी आणि दोन मुलांची आई. काही लोक म्हणतात कि तिने गृहिणी बनवून डिग्री वाया घालवली आणि चांगली नौकरी सोडली. परंतु अनुया ला आपल्या दोन्ही मुलांसाठी भरपूर वेळ द्यायचा होता. ती वर्किंग वूमनना नावं ठेवत नाही किंवा त्यांना बेजबाबदार म्हणत नाही. पण तिला फुल-टाइम मदार बनायचे होते.

श्रेया आहे एक वर्किंग वूमन, एक बिझनेस ओनर जी आपले घर, मुले आणि करिअर सर्व सांभाळते. काही म्हणतात कि मुलं हाताबाहेर जातील तेव्हा समजेल, पण तिने मुलांना संस्कार देत आहे आणि आपले करिअर सांभाळत आहे.

थोडक्यात काय, नौकरी करा नाहीतर नका करू, एक स्त्री जेव्हा आईच्या भूमिकेत शिरते, तेव्हा ती पूर्णपणे आणि यशस्वीपणे बजावते.

२. अर्पिता आहे सिंगल मदर. मुलगी झाल्यावर नवऱ्याकडच्या लोकांनी तिला घरातच घेतले नाही. परिस्थिती खूप वाईट होती कारण एकदा लग्न लावून दिल्यावर, घरच्यांना सुद्धा तिची किंवा तिच्या मुलीची जबाबदारी घ्यायची नव्हती. तिने ठरवले कि एकटीनेच मुलीला वाढवायचं आणि तिला सक्षम बनवायचं. अर्पिताला ऑफिसमध्ये सर्व स्ट्रॉंग वुमन म्हणतात, ती म्हणते, 'माझ्याकडे स्ट्रॉंग बनण्याचेच ऑप्शन होते, दुसरे कुठलेही पर्याय नव्हते.’

प्रियाचा नवरा तिची मुले शाळेत असतानाच वारला. प्रिया खचली, काही निर्णय चुकले, मुलांच्या अभ्यासातहि खूप दुर्लक्ष झालं. तिचे नातेवाईक म्हणाले, 'किती तो शोक करायचा, नवरा जाण्याचा. शेवटी मुलांकडे बघून तरी सावरायचं ना.’ प्रियाला सत्य समजले कि एका आईला शोक करायला सुद्धा परवानगी नाहीये. ती सावरली आणि मुलांना मोठं केलं. बायकोची भूमिका संपली हे तिला स्वीकारावं लागलं आणि आईचीच भूमिका बजावली.

३. सईचं लग्न झाले तेव्हा तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडून आधीच कबुल करून घेतले होते कि मी माझ्या आईची काळजी लग्नानंतर घेत राहणार. आईला कौतुक वाटले पण तिला खात्री होती कि अशी वेळ येणार नाही आपल्या लग्न झालेल्या मुलीकडे राहावं लागेल. पण तसे घडून आले. सईने आईची सर्व जबाबदारी घेतली. आईला जेव्हा स्वतः उठून रोजची कामे करता येत नव्हती, तेव्हा तिने तिला भरवणे, तिला अंघोळ घालणे, तिला पेपर वाचवून देणे, तिला फिरायला घेऊन जाणे, सर्व केले. आईला आजारपणामुळे समजतहि नव्हते कि काय चालू आहे, पण सईने तिची काळजी घेतली - अगदी आईसारखी.

अंजुला सगळे म्हणायचे, ‘लग्नाचे वय झाले आहे, लवकर लग्न करून घे. असाच नवरा बघ ना कि जो तुझ्या आजारी आईवडिलांनासुद्धा सांभाळेल. कमी शिकलेला पण चालेल. घर जावई करा म्हणजे तुझे लग्नहि झाले आणि आईवडिलांची जबाबदारी पण बघेल.’ पण अंजुला पटले नाही. इतके उच्च शिक्षण घेऊन एखाद्या १२वि पास मुलाशी लग्न करायचे, ते पण तडजोड म्हणून. लवकर लग्न करून घेणे म्हणजे काय बसमध्ये चढण्यासारखे आहे का? तिने कोणाचे ऐकले नाही, आपल्या आईवडिलांच्या सेवेत राहिली आणि आपला बिझनेस चालू ठेवला. आईवडिलांच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिने पाठ फिरवून पाहिले नाही. ते गेल्यावरही तिला काही खंत वाटली नाही कि आपण लग्न केले नाही याची . कारण ती आईच्या भूमिकेत शिरली होती, फक्त लग्नाचे वय झालेल्या मुलीच्या भूमिकेत नाही.

४. २३ वर्षाची माया जेव्हा ५ वर्षांच्या मिनीला भेटली, तेव्हा ती मिनीची आई बनली. माया च्या मम्मीला वाटले, मुलीला मिनीचा लळा लागला आहे, हेच वय आहे, लग्न लावून टाकू आणि तिला हवे तसे ती आई बनेल. पण मायाच्या मनात काही वेगळेच होते. एके संध्याकाळी ती मम्मी जवळ आली आणि म्हणाली, "मिनी तिच्या काका काकूंकडे राहते, ज्यांना ती अजिबात नको आहे. मला मिनीला दत्तक घ्यायचे आहे? मी होणार तिची आई." मम्मी बिचकलीच, तिला अंदाज नव्हता कि माया असा निर्णय घेईल, पण थोड्या दिवसांनी मम्मी तयार झाली मिनीची आजी व्हायला.

अनुष्का दर रविवारी पुण्याला जायची, हे तिच्या आईवडिलांच्या लक्षात आले. तिने एकदा त्यांना सत्य सांगायचे ठरवले, "आई, बाबा, मी एक मुलगा दत्तक घेणार आहे. म्हणजे, तो आपल्या घरी राहणार नाही, सेण्टरवरच राहील, पण मी त्याची आई होणार आहे. त्याच्या शिक्षणाची जबाबदारी आणि आईची माया लावणार आहे." निर्णय खूप मोठा होता, पण तो घरच्यांना पटला.

५. अर्चनाला डिवोर्स मिळवून दोन वर्षे झाली होती. घरचे म्हणाले कि आता मूव्ह ऑन केले आहेस, तर दुसरा जोडीदार बघायला हरकत नाही. पण सहा महिन्यापूर्वी अर्चनाची मोठी बहीण वारल्यामुळे, तिने तिच्या २ वर्ष्याच्या मुलीची जबाबदारी घेतली होती. घरच्यांनी सुचवले, "लहान मुलीची आई बनवून जा. म्हणजे मोठ्या बहिणीच्या यजमानांबरोबर लग्न करून घे. चांगले आहेत ते. आपण बरेच वर्ष पाहतच आहोत त्यांना. म्हणजे आधीसारखा अनुभवहि येणार नाही." पण अर्चनाच्या मनात वेगळेच होते. तिला बहिणीच्या मुलीची आई व्हायचं होतं, पण जिजाजींबरोबर लग्न न करता. काही महिन्यात जिजाजी तयार झाले, त्यांना दुसरं लग्न करायचं होतं पण लहान मुलीला हॉस्टेल मध्ये ठेवण्यापेक्षा त्यांनी अर्चनाला दत्तक दिले.

६. रिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने आधीच ठरवले होते कि आपण मुलं करायची नाहीत. म्हणजे त्यांना काय मुलांचा राग वगरे यायचा नाही. रिया स्वतः तिच्या दोन मैत्रिणींच्या मुलांची गॉडमदार होती. पण रिया आणि तिच्या बॉयफ्रेंडला स्वतः ची मुले नको होती. अगदीच वाटले कि कुणीतरी हवं आहे तर ऍडॉप्ट करू असे त्यांनी ठरवले.

लग्नाला दहा वर्षे झाली आहेत, मुले नाहीत आणि ऍडॉप्ट करायचे अजून ठरवले नाही. पण रिया इस अ मदर. तिच्या दोन डॉगीची. मोठा आहे एक गोल्डन रिट्रीवर, बुझो जो खूप समजूतदार आहे आणि आईचा, म्हणजे रियाचा लाडका. आणि छोटा आहे सर्वांचा लाडका, शीह-झू, बोबो. खूप मस्ती करतो आणि आपले लाड करून घेतो.

तर मग मंडळी, चला करूया या सर्व अद्वितीय माउलींना प्रणाम आणि यांना मदर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा.

Logged in user's profile picture