हिवाळ्याची खास रेसिपी - बाजरीचे वड
2 minuteRead
(You can read this Blog in English here)
By Drashti Dhamsania
गुजराती माणसाची हिवाळ्यातील अत्यंत आवडती, रुचकर रेसिपी म्हणजे - बाजरीचे वडे. हे कुरकुरीत वडे यम्मी, स्वादिष्ट असतात आणि या थंडीच्या दिवसांत तुम्ही ते नक्की बनवून पाहा. एकदा का तुम्ही हे वडे बनवून खाल्लेत, की हा तुमचा हिवाळ्यातील आवडता स्नॅक्स बनून जाईल असा आम्हाला विश्वास आहे. ही रेसिपी पाहून हे वडे घरच्या घरी बनवा. आणि तयार वड्यांचे भरपूर फोटो काढून ते तुमच्या सोशल मीडियावर शेअर करून आम्हाला @girlsbuzzindia ह्या हँडलवर टॅग करायला विसरू नका. :)
साहित्य
२ मोठे चमचे गूळ (गुळात गरजेनुसार पाणी घालून घ्या)
१ कप बाजरीचे पीठ
अर्धा कप गव्हाचे पीठ
१ कप मेथीची पाने
२ मोठे चमचे धणे
१ मोठा चमचा आले
१ मोठा चमचा हिरवी मिरची
१ मोठा चमचा पातीचा कांदा बारीक चिरून
२ मोठे चमचे तीळ (भाजलेले)
१ मोठा चमचा लोणच्याच्या मसाला
१ छोटा चमचा ओवा
१ छोटा चमचा लिंबाचा रस
१ छोटा चमचा धणेपूड
१ छोटा चमचा हळद
२ मोठे चमचे लाल तिखट
अर्धा छोटा चमचा फ्रूट सॉल्ट
३ मोठे चमचे दही
चिमूटभर हिंग
चवीनुसार मीठ
कृती
१. २ मोठे चमचे गूळ घ्या आणि तो विरघळेपर्यंत पाण्यात भिजवा.
२. वर दिलेले सर्व साहित्य एकत्र करा आणि त्यात गुळाचे पाणी घाला.
३. हे पीठ मध्यम, बेताचे नरम होईपर्यंत मळून घ्या.
४. थोडेसे तेल तळहाताला चोळून घ्या. आता पिठाचा एक गोळा हातात घ्या, वळून घ्या, आणि हलकेसे दाबून त्याला टिक्कीसारखा आकार द्या.
५. तळण्यासाठी तेल गरम करा.
६. या टिक्क्या मध्यम-मोठ्या आचेवर सोनेरी-तपकिरी रंगाच्या होईपर्यंत तळून घ्या.
७. अतिरिक्त तेल शोषले जावे म्हणून त्या एका टिशू पेपरवर काढून घ्या.
८. बाजरीचे वडे सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत!
एन्जॉय!
अनुवाद: अन्योक्ती वाडेकर Translated by Anyokti Wadekar
Write, Record and Answer! Consume Unlimited Content! All you need to do is sign in and its absolutely free!
Continue with one click!!By signing up, you agree to our Terms and Conditions and Privacy Policy.


