महाराष्ट्र दिन: दिवस उत्साहाचा, उत्सव पराक्रमचा!

8 minute
Read

Highlights या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र दिनाचं वैशिष्ट्य आणि महाराष्ट्र राज्य स्थापने बद्दलची थोडीफार माहिती.

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.
आज जर संपूर्ण भारतवर्षाचा इतिहास लिहायला घेतला तर त्यामध्ये महाराष्ट्र नावाचं पान नाही असं शक्यच नाही. दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्राचा स्थापना दिवस असतो. लौकिक रित्या बघायचं झालं तर १९६० मध्ये, म्हणजे तब्बल ६२ वर्ष आधी याच दिवशी पंडित नेहेरूंनी या महाराष्ट्राची कमान यशवंतराव चव्हाण यांच्या हाती सुपूर्त केली होती. अश्या प्रकारे 'महाराष्ट्र' नावाची गुढी पुन्हा नव्या ताकतीने, नव्या जोमाने मान उंचावून उभी राहिली. आपल्या सगळ्यांनाच हे ठाऊक आहे की या दिवशी आपल्या ऑफिसला, बँकेला आणि शाळेला सुट्टी असते. पण नेमका महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो कधी या बाबतीत तुमच्या मध्ये कुतूहल निर्माण झालं आहे? अगदी स्वाभाविक रित्या तुम्हाला या बाबत कुतूहल निर्माण झालं असावं. कारण आपण ज्या राज्यात राहतो, त्या राज्याची नेमकी पार्श्वभूमी काय? आणि त्यातून महाराष्ट्रला तर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यांची तर मांदियाळी आहे, हे जाणून घेणं नेहेमीच आनंददायी असते.
 
 
Source: news18
 
1956 मध्ये स्टेट रेकग्निशन ऍक्ट नावाचा एक कायदा पारित करण्यात आला होता, ज्यामुळे भारतातील विविध राज्यांमध्ये बोलल्या जाणार्‍या भाषेंवर आधारित सीमा परिभाषित केल्या होत्या. यामुळे ‘बॉम्बे स्टेट’ची निर्मिती झाली, जिथे मराठी, कोकणी, गुजराती आणि कच्छी या भाषा बोलल्या जात होत्या. ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ने पुढे मुंबई राज्याची दोन राज्यांमध्ये विभागणी केली – गुजराती आणि कच्छी भाषिक जनसमुदायाने बनलेला गुजरात आणि मराठी आणि कोकणी भाषिक जनसमुदायाने बनलेला महाराष्ट्र. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांची निर्मिती अशा प्रकारे 25 एप्रिल 1960 रोजी भारतीय संसदेने लागू केलेल्या बॉम्बे रेकग्निशन ऍक्ट 1960 नुसार झाली. याच मुळे १ मे ला केवळ महाराष्ट्राचाच नव्हे परंतु गुजरातचा देखील स्थापना दिवस असतो. याच बरोबर दरवर्षी १ मे या तारखेला जागतिक कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो.
 
 
Source: indiatoday
 
परंतु बॉम्बे स्टेटचा संयुक्त महाराष्ट्र झाला, ही काही एका रात्रीतील कमाल नव्हती आणि न अगदी सोप्या पद्धतीने पार पडलेली ही घटना होती. आचार्य अत्रे, श्रीधर जोशी, श्रीपाद डांगे आणि या सारख्या कित्येक मंडळींनी सयुंक्त महाराष्ट्रचा नारा बुलंद ठेवला आणि शेवटी मुंबईला महाराष्ट्राचा एक अविभाज्य अंग बनवूनच विश्राम घेतला. फक्त स्वतंत्र सैनिक किंवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्तेच नव्हे तर लेखक, शाहीर, आणि कलाकार मंडळी सुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उतरली. महाराष्ट्राचं हास्य दैवत पु. ल. देशपांडे म्हणजेच भाई, ज्यांच्या आवाजाने महाराष्ट्रातल्या कणा कणातुन अभिमानाचे अंकुर फुटतात असे शाहीर बापूराव पट्ठे, या सारख्या मंडळींनी देखील सयुंक्त महाराष्ट्र बनवण्यात मोलाची भूमिका निभावली आहे.
 
 
Source: memumbai
 
तुम्हाला आधी पासून ठाऊक आहे की महाराष्ट्र सरकार कडून दरवर्षी या दिसवशी जाहीर सुट्टी असते, जी राज्याच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये आणि कंपन्यांना, शाळा आणि महाविद्यालयांना लागू होते. पण त्याच सोबत दरवर्षी मुंबईतील शिवाजी पार्क येथे परेडचे देखील आयोजन केले जाते, जिथे महाराष्ट्राचे राज्यपाल भाषण देतात. परेडला दरवर्षी मोठा जनसमुदाय हजेरी लावतो. या दिवसाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, या दिवशी दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात दारू विक्रीवर बंदी घालण्यात येते. वार्षिक परेड व्यतिरिक्त, स्थानिक लोक देखील हा दिवस मोठ्या उत्साहाने आणि उत्कटतेने साजरा करतात. तुम्हाला राज्यभरातील अनेक लोक भगवा फेटा आणि पांढरा कुर्ता परिधान करून संगीत रॅलीमध्ये सहभागी होताना दिसतील. त्याच वेळी, महिला त्यांच्या सर्वोत्तम पारंपारिक पोशाख आणि दागिन्यांमध्ये सजल्या असतात. भगवा झेंडा फडकावत बुलेट मोटरसायकलवर स्वार होणारे लोक, महाराष्ट्र दिन आणि नाशिक ढोलाच्या तालाचे एक जणू त्रिकुटच बनले आहे. कारण या तिन्ही गोष्टी खासकरून या दिवशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात दिसतील.
 
 
Source: quoracdn
 
महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक आहे आणि उपखंडाच्या पश्चिम द्वीपकल्पातील दख्खनच्या मैदानाचा एक प्रचन्ड मोठा भाग व्यापणारे राज्य आहे. त्याचे स्वरूप काहीसे त्रिकोणी भागासारखे दिसते, 450 मैल म्हणजेच 725 किमी पश्चिम किनारपट्टी आहे आणि त्याचे आतील भाग पूर्वेला सुमारे 500 मैल म्हणजेच 800 किमी शिखरापर्यंत अरुंद आहे. महाराष्ट्र राज्याच्या वायव्येला गुजरात राज्य, उत्तरेला मध्य प्रदेश राज्य, पूर्वेला छत्तीसगड राज्य, आग्नेयेला तेलंगणा राज्य, दक्षिणेला कर्नाटक राज्य आणि नैऋत्येला गोवा राज्य आहे. दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशासह त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र देखील आहे.
 
 
Source: indiaexpress
 
मुंबई (पूर्वी बॉम्बे म्हणून ओळखली जाणारी) ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि पश्चिम किनार्‍यावरील एक बेट शहर आहे जे मुख्य भूभागाशी रस्ते आणि रेल्वेने जोडलेले आहे. भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे, महाराष्ट्र राज्य ही भारताची सर्वात मोठी व्यावसायिक आणि औद्योगिक राजधानी आहे आणि देशाच्या सामाजिक आणि राजकीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
 
आपल्या महाराष्ट्राला दैवी देणगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे, संत तुकाराम, आणि या सारख्ये कित्येक महापुरुष या मातीत जन्मास आले आणि अश्या या महाराष्ट्रात आपलाही जन्म झाला हे आपलं किती अहोभाग्य! आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत देवाच्या चरणी हीच प्रार्थना करेल की, हे देवा... 
 
दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!
आणि…
पुन्हा मानव जन्म मिळाला तर “मराठीच” होईन!
 
कवी: अज्ञात
 
पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
 
 
Logged in user's profile picture




महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?
1956 मध्ये स्टेट रेकग्निशन ऍक्ट नावाचा एक कायदा पारित करण्यात आला होता, ज्यामुळे भारतातील विविध राज्यांमध्ये बोलल्या जाणार्‍या भाषेंवर आधारित सीमा परिभाषित केल्या होत्या. यामुळे ‘बॉम्बे स्टेट’ची निर्मिती झाली, जिथे मराठी, कोकणी, गुजराती आणि कच्छी या भाषा बोलल्या जात होत्या. ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ने पुढे मुंबई राज्याची दोन राज्यांमध्ये विभागणी केली – गुजराती आणि कच्छी भाषिक जनसमुदायाने बनलेला गुजरात आणि मराठी आणि कोकणी भाषिक जनसमुदायाने बनलेला महाराष्ट्र. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांची निर्मिती अशा प्रकारे 25 एप्रिल 1960 रोजी भारतीय संसदेने लागू केलेल्या बॉम्बे रेकग्निशन ऍक्ट 1960 नुसार झाली. याच मुळे १ मे ला केवळ महाराष्ट्राचाच नव्हे परंतु गुजरातचा देखील स्थापना दिवस असतो. याच बरोबर दरवर्षी १ मे या तारखेला जागतिक कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो.
कोणता दिवस महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो ?
दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्राचा स्थापना दिवस असतो. लौकिक रित्या बघायचं झालं तर १९६० मध्ये, म्हणजे तब्बल ६२ वर्ष आधी याच दिवशी पंडित नेहेरूंनी या महाराष्ट्राची कमान यशवंतराव चव्हाण यांच्या हाती सुपूर्त केली होती