चिंतेवर मात करण्यासाठी आपली मानसिकता कशी बदलावी?- चार माइण्डसेट शिफ्ट्स - भाग १
7 minuteRead
 
                                    
                                
एन्झायटीवर मात करण्यासाठी माइण्डसेट शिफ्ट्स -
चिंता, काळजी आणि भीती, म्हणजेच इंग्लिशमध्ये ज्याला एन्झायटी म्हणतात ती आजकाल बऱ्याच महिलांमध्ये दिसून येते. भारतातील मानसिक आरोग्य विकारांमध्ये स्त्रियांचा वाटा सर्वाधिक आहे, ज्याचे प्रमाण अनुक्रमे 39 टक्के आणि 30 टक्के तणाव आणि चिंताग्रस्त आरोग्य विकारांसाठी आहे.
महिलांना आपल्या आयुष्यात बरेच काही बदल करावे लागतात. आईवडिलांची काळजी घेणे, लग्न करणे, संसारात रमणे, आणि सासू-सासरे आणि नवरा यांची देखभाल करणे, मुलांचे संगोपन करणे. या प्रत्येलक प्रत्येक चिंता आलीच. तसेच, काही व्हिटॅमिन च्या अभावामुळेसुद्धा महिलांना डिप्रेशन आणि एन्झायटीच्या सामोरे जावे लागते.
तुम्हाला पण एन्झायटीचा त्रास होतो का? नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही काय करता? खोल श्वास घेणे, इसेन्शियल ऑईल्स चा वापर करणे, म्युझिक ऐकणे, यासारखे उपाय करता का? हे उपाय तात्पुरते ठीक आहेत. एन्झायटीवर मात करण्यासाठी मनाचे परिवर्तन करणे गरजेचे आहे. इंग्लिश मध्ये 'माईन्डसेट शिफ्ट्स' असे म्हणतात. हे लगेच अपेक्षित नाहीत, त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ आणि सयंम ठेवावा लागेल.
तर आज आपण ४ महत्वाचे माइण्डसेट शिफ्ट्स जाणून घेणार आहोत.
- एन्झायटीला तुमची आयडेंटिटी बनवू नका.
आजकाल, इंटरनेटवर एन्झायटी, डिप्रेशनची चिन्हे आणि लक्षणे सहज वाचनात आली जातात. आणि त्यामुळे आपल्याला वाटते कि मला एन्झायटी आहे ना, मग माझ्यात पण हि सर्व लक्षणे आहेत. आपला सेल्फ-टॉक बदलून जातो.
"मला ना, ऑफिस चा कॉल आला ना कि टेन्शन वाढतं आणि एन्झायटी अटॅक येतो."
"एन्झायटी मध्ये असच होतं. मला माहीत आहे ना, मी वाचली आहेत लक्षणे."
"मला आता एन्झायटी आहे ना, मग हे असं छातीत धडधडणं, अस्वस्थ वाटणं, फोकस न होणं, हे होणारच. तशी चिन्हं दिसून येतात व्यक्तीमध्ये."
"मी आता एक चिंताग्रस्त वक्ती झालेली आहे, तर हि सगळी चिन्हे माझ्या आयुष्यातील भाग झालेली आहेत."
जर तुमचा सेल्फ-टॉक असा झाला आहे, तर त्यामधील बद्दल करणं गरजेचं आहे. एन्झायटी हि तुमच्या आयडेंटिटीचा भाग नाही. तुमची ओळख 'एक चिंताग्रस्त व्यक्ती' म्हणून करू नका. आपला सेल्फ-टॉक बदला आणि मग बघा, तुम्हाला किती छान वाटते ते!🌈
२. चिंता बाळगू नका.
काही महिला फार पझेसिव्ह असतात आणि त्या एन्झायटीला पण पझेस करतात. म्हणजे, नेमके काय करतात, तर एन्झायटी ला आपलेसे करून घेतात.
उदाहरणार्थ,
"मला ना मॉल मध्ये गेलं ना कि माझ्या ब्रेकअप ची आठवण येते, आणि 'माझी एन्झायटी' परत वाढते."
"तुला माहीत आहे नं, ‘माझी एन्झायटी’ आजकाल कधीपण वाढते, म्हणून मी लोकांमध्ये मिसळत नाही."
"’माझ्या एन्झायटीसाठी’ खूप प्रयत्न केले आहेत, कमीच होत नाही."
या वाक्यांमध्ये स्पष्टपणे दिसून येते कि तुम्ही चिंतेला बाळगून ठेवले आहे. चिंता आहे, एवढेच मान्य करा, चिंतेला आपलंसं करण्याची गरज नाही. म्हणून, आजपासून, 'माझी एन्झायटी' हे शब्द वापरू नका.
जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला 'माझी' म्हणतो, तेव्हा त्या गोष्टीला आपण खूप महत्व देतो आणि काळजी करतो. 'माझी त्वचा' असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्वचेबद्दल आपल्याला खूप आत्मीयता असते, आणि आपण त्वचेची काळजी मनापासून घेतो.
तसेच, जेव्हा आपण 'माझी एन्झायटी' असे म्हणतो, तेव्हा एन्झायटीची काळजी करतो, आणि अगदी मनाला लावतो. 🤗
हि माइण्डसेट शिफ्ट तुम्हाला खूप उपयोगी पडेल. चिंतेला मनात शिरू देऊ नका, आणि आपल्या हृदयात आणि वाणीत जागा देऊ नका.
३. चिंतेला तर्कशुद्धपणे स्वीकारा.
कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वीकृती ही गुरुकिल्ली आहे. जेव्हा तुम्ही कोणतीही परिस्थिती स्वीकारता, तेव्हा तुम्हाला 'अवेरनेस' असते. तुम्हाला समजते कि तुमच्यात काही लक्षणे आहेत, म्हणूनच तुम्ही त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न करता.
जर तुम्ही एन्झायटी स्वीकारलेच नाही, तर तुम्हाला त्यावर मात करता येणार नाही. आणि तुम्ही त्यासाठी विधायक पावले उचलणार नाही. म्हणून, स्वीकृती किंवा इंग्लिशमध्ये ज्याला 'एक्सेप्टन्स' म्हणतात ते गरचेजे आहे.
पण स्वीकृतीची सुद्धा काही मर्यादा आहे? म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल कि,
"मला तर एन्झायटी आहे ना. मग असं होतच. मी आता एक्सेप्ट केले आहे." 😰
"मला सोशल एन्झायटी आहे ना, मग मी जास्त बाहेर पडणं टाळते. उगाच कशाला वाढवायची. थोडं नुकसान होईल, पण मला एन्झायटीचा त्रास तर होणार नाही ना."
"मी एक्सेप्ट केलं आहे कि एन्झायटी होणारच. कशाला उगीच जास्त मेहनत करायची?"
स्वीकृती चांगली आहे पण तुम्ही काही 'बाउंड्रीज' ठेवणे फायदेशीर आहे. आता असं होतच राहणार, हि मानसिकता आत्मसात करण्याची गरज नाही. अशी स्वीकृती करा कि तुम्ही एन्झायटीवर मात करण्यासाठी सज्ज व्हाल आणि तसे प्रयत्न कराल. थोडक्यात, स्वीकृती हि तर्कशुध्दपणे करावी. 💯💯
४. नियंत्रण घटकांकडे लक्ष द्या.
चिंतेचे एक महत्वाचे कारण आहे कि आपण सर्व गोष्टींवर नियंत्रण करू इच्छतो. लक्षात असू द्या कि आपण सर्व जगातील सर्व गोष्टींवर नियंत्रण करू नाही शकत. काही गोष्टी किंवा आयुष्यातील घटक आपल्या नियंत्रणाबाहेर असतात.
उदाहरणार्थ, आपल्या हातात फार थोड्या गोष्टी असतात जे आपण कंट्रोल करू शकतो, जसे आपले विचार, आपले पर्याय, आपले शब्द आणि आपली कृती. पण दुसर्याचे वागणे आणि वाक्य आपण नियंत्रण करू शकत नाही. तसेच, आपल्या देशाची आर्थिक स्थिती, हवा, ट्रॅफिक, बातम्या, आणि आपला भूतकाळ, ये नियंत्रणात बसत नाही.
तर मुद्दा असा आहे कि ज्या गोष्टींवर तुमचे नियंत्रण नाही, त्यांच्यावर जास्त विचार करून काहीच उपयोग नाही. पण ज्यावर तुम्ही नियंत्रण करू शकता, त्या गोष्टींचा सखोल विचार नक्की करा .
जेव्हा तुम्ही नियंत्रणाबाहेरील गोष्टींवर जास्त विचार करता आणि वेळ खर्च करता, तेव्हा त्याचे रूपांतर एन्झायटी किंवा चिंता यामध्ये होते.
तर वरील माइण्डसेट शिफ्ट्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील आणि एन्झायटी वर मात करण्यात यशस्वी होऊ शकता. परंतु, हे शिफ्ट्स आणि मनाचे परिवर्तन हे लगेच होऊ शकत नाही. थोडा किंवा बराच वेळ लागू शकतो. एन्झायटी साठी बरेच असे उपाय इंटरनेटवर सापडतील जे ५ सेकंदात काम करू शकतील. पण असे परिणाम क्षणिक असतात. म्हणून, थोडा वेळ द्या आणि माइण्डसेट शिफ्ट्स करा, ज्याने तुम्ही एन्झायटी पेक्षा जास्त मनाने बळकट होऊ शकता. 💪🏋️♀️
Write, Record and Answer! Consume Unlimited Content! All you need to do is sign in and its absolutely free!
Continue with one click!!By signing up, you agree to our Terms and Conditions and Privacy Policy.
 
                


 
                                 
                                     
                                     
                                     
                                     
                                    