चिंतेवर मात करण्यासाठी आपली मानसिकता कशी बदलावी - चार माइण्डसेट शिफ्ट्स - भाग 2

8 minute
Read

Highlights

एन्झायटीवर मात करण्यासाठी अजून काही माइण्डसेट शिफ्ट्स पाहूया -



Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

Read the previous part of the blog here- भाग 1

आजची ब्लॉग पोस्ट त्या महिला आणि मुलींसाठी आहे ज्या चिंतेने ग्रस्त आहेत. या आधी आम्ही काही माइण्डसेट शिफ्ट्स शेर केले आहेत, ते तुम्ही नक्की वाचून घ्या. तुम्हाला खूप फायदा होईल आणि एन्झायटीवर मात करायला सर्व शिफ्ट्स उपयोगी ठरतील. पण काही अनिवार्य कारणांमुळे, एन्झायटी खूपच वाढते आणि ती आटोक्यात आणण्यासाठी फक्त चार माइण्डसेट शिफ्ट्स कमी पडतात.

म्हणूनच आम्ही अजून काही सरळ आणि प्रभावी माइण्डसेट शिफ्ट्स घेऊन आलोय. हे शिफ्ट्स समजायला सोपे आहेत पण जर तुम्ही वेळ दिलात आणि आपला सेल्फ-टोक थोडा सुधारलात, तर तुम्हाला नक्की फरक दिसून येईल.

एन्झायटी समोर हार मानू नका. नेहमी लक्षात ठेवा कि तुम्ही एन्झायटी पेक्षा मनाने बळकट आणि स्मार्ट आहात. म्हणून, चिंतेसमोर हाथ जोडू नका, आणि खाली दिलेले माइण्डसेट शिफ्ट्स अमलात आणा.

१. थोड्या वेळासाठी 'बोर्ड' बनून जा. 

तुम्ही कधी बोर्ड गेम्स खेळला आहात का? जसे, बुद्धिबळ, सापशिडी, मोनोपोली, लाईफ, आणि अजून बरेच काही. आपण बुद्धिबळ चे उदाहरण घेऊया. या खेळामध्ये पांढरे आणि काळे दोघांमध्ये युद्ध चालू असते. तसेच, आपल्या मनात देखील, पॉसिटीव्ह आणि नेगेटिव्ह विचारांमध्ये युद्ध चालू असते. एन्झायटी नेगेटिव्ह विचार बनून  तुम्हाला हैराण करते. आणि तुम्ही चांगली पुस्तके वाचून, चांगले व्हिडिओस बघून, आणि अजून काही अँटी-एन्झायटीचे उपाय करून त्यावर मात मिळवू इछता. पण या सर्व प्रक्रियेतून तुम्ही थकून जाता. तुमच्यामध्ये ऊर्जा कमी होते कारण तुमच्या मनात सतत या दोन विचारांचे युद्ध चालू असते. 

तुम्हाला वाटते कि तुम्ही अजून प्रयत्न केलात तर तुमच्या मनातील पांढरे सैनिक ♟म्हणजेच पॉसिटीव्ह विचार जिंकतील, पण नेगेटिव्ह विचार म्हणजे एन्झायटी सतत तुम्हाला चॅलेंज करत असते.

यावर काही उपाय आहे का? हो, नक्कीच आहे. बुद्धिबळाचा बोर्ड पाहिला आहे का? बोर्ड ला कधीच पर्वा  नसते कि कोण जिंकत आहे - काळे कि पांढरे सैनिक? बोर्ड फक्त पाहत असतो कि खेळ कसा चालू आहे. तो कोणाची बाजू घेत नाही, कमीजास्त करत नाही किंवा न्यायाधीश होत नाही. तुम्ही त्या बोर्ड सारखे होऊ शकता का?

युद्धात सहभाग घेऊन काही हाती लागत नाही, यात तुम्हीच थकून जाता आणि आपल्या आयुष्यातील जवळच्या माणसांना दूर करता. आपल्या आयुष्यातील गोल्स साध्य करू शकत नाही. म्हणून, त्या बोर्ड सारखे व्हा. युद्धात सहभागी होऊ नका, आपले विचार चांगले आहेत कि वाईट याचं वर्गीकरण करू नका. कोणत्याही विचारांची बाजू घेऊ नका. फक्त न्यूट्रल राहा आणि स्वतःला 'बर्न-आऊट' पासून सांभाळा. लक्षात ठेवा कि तुमचे गोल्स आणि वॅल्युस हे जास्त महत्वाचे आहे, विचारांच्या युद्धात जिंकणे किंवा हरणे हे महत्वाचे नाही.

२. थोडीशी चिंता होणे, हे स्वाभाविक आहे. 🙆

जगात असा कोणी माणूस किंवा महिला सापडणार नाही जी कधीच चिंता करत नाही. प्रत्येकाला चिंता होतेच, फक्त त्या चिंतेचे प्रमाण कमी-जास्त होत असते. म्हणून, आपल्याला एन्झायटी आहे, याचं मोठा इश्यू करण्याची काहीच गरज नाही.

आपण इशा चं उदाहरण घेऊया. ईशाला जेव्हा एन्झायटीचा त्रास होऊ लागला, तेव्हा ती जास्तच घाबरली. लोकांमध्ये वावरणं टाळू लागली. तिला सोशल एन्झायटी असल्यामुळे ती खूप स्ट्रेस्स्ड असायची. काही दिवसांनी, तिचा त्रास कमी झाला. काउन्सेलिंग आणि बऱ्याच काही उपायांमुळे तिची चिंता कमी झाली. पण जर कोणती गोष्ट तिच्या मनासारखी झाली नाही, तर एन्झायटी लगेच ट्रिगर व्हायची. आपल्याला पहिल्यासारखी व्यक्ती भेटून परत त्रास होणार नाही ना, याचाच सतत विचार करायची.

त्यामुळे, एन्झायटी आटोक्यात येऊन सुद्धा तिला त्रास होत होता. तिने समजूनच घेतले नाही कि थोडीशी चिंता आणि सोशल एन्झायटी 'ओके' आहे. आपण जेव्हा स्टेजवर भाषण देतो किंवा नवीन व्यक्तीबरोबर बिझनेस विषयी बोलतो, तेव्हा थोडी चिंता होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे एन्झायटी ट्रिगर होणं हे काही 'आउटकम' नाही.

म्हणून, थोडी चिंता वाटली तर लगेच घाबरून जाऊन तोल जाण्यात काही अर्थ नाही. थोडी चिंता सर्वानाच होते. लक्षात ठेवा, 'इट इस ओके 🆗 नॉट टू बी ओके.' 👌

३. एन्झायटीचे ‘कॉस्टस’ जाणून घ्या.

हे माइण्डसेट शिफ्ट समजण्यासाठी आपण परत इशा चं उदाहरण घेऊया. सोशल एन्झायटी असलेल्या ईशाला लोकांशी संवाद घालायला टेन्शन येतं. मग यात महत्वाच्या मिटींग्स आल्या आणि इव्हेंट्स सुद्धा. एकदा इशाला एका स्टार्टअप इन्वेस्टर्सच्या सेमिनार ला जायचे होते. तिला पक्की खात्री होती कि तिच्या स्टार्टअप आयडिया लोकांना खूप आवडेल आणि तिला फायनान्स साठी उपयोग होईल. पण त्याच सकाळी ईशाला खूप त्रास झाला. अनोळखी लोकांसमोर प्रेसेंटेशन करायचे, या विचाराने तिला एन्झायटीचा प्रचंड त्रास झाला आणि ती इव्हेंटला गेलीच नाही.

यात तिचं खूप नुकसान झाले. ज्या आयडिया साठी तिला प्रोत्साहन, फायनान्स आणि ओळख मिळणार होती, ती अजिबात दिसली नाही. ती घरी राहिली आणि तिला अजूनच स्ट्रेस आला.

आता तुम्ही सांगा, तुम्ही एन्झायटीमुळे किती संध्यांना चुकवलं आहे. हे सर्व ‘एन्झायटी कॉस्टस’ मध्ये जोडले जाते. 

जेव्हा तुम्हाला जाणवेल कि तुम्ही भीतीमुळे किंवा चिंतेमुळे एखादी महत्वाची गोष्ट टाळत आहात, तर तुम्ही सुद्धा एन्झायटी कॉस्टस चे कॅल्क्युलेशन 🧮 करू शकता. एन्झायटी कॉस्टस चं बॅलन्स वाढवू नका, पुढे चला आणि त्या गोष्टीला प्राधान्य द्या.

४. एन्झायटी साठी सोशल डिस्टंसिन्ग करा.

काही व्यक्तींना एन्झायटीचा इतका त्रास होतो कि ते तुम्हालापण चिंतेच्या जाळ्यात अडकवतात.

आता पलक चे उदाहरण घ्या ना. पलकला प्रचंड एन्झायटीचा त्रास होतो. ऑफिसमध्ये थोडे जास्त काम झाले, किंवा ऑर्डर केलेले मिन्त्राचे पार्सल चुकीचे आले, किंवा बॉयफ्रेंड कुठल्या मुलीला मेसेज करत असेल, कि पलकची एन्झायटी अगदी आकाशाला भिडते. तिचे घरचे आणि जवळचे मित्र-मैत्रिणी तिला सांभाळून घेतात. पण जेव्हा ती मुंबईला शिफ्ट झाली, तेव्हा तिच्या फ्लॅटमेंट्सना तिच्या चिंतेमुळे त्रास झाला. ती सर्वांचीच एन्झायटी वाढवू लागली आणि रोजच्या तिच्या अशा गोंधळामुळे तिला लोक अव्हॉइड करू लागले.

जर तुमच्याहि आसपास अशी कुणी व्यक्ती असेल जी तुमची एन्झायटी बिनाकारण वाढवत असेल, तर तुम्ही हो सोशल डिस्टंसिन्ग कर शकता. गिल्टी फील करू नका, तुमची मानसिक स्थिती हि जास्त महत्वाची आहे. 

तर, असे हे चार माइण्डसेट शिफ्ट्स तुम्हाला एन्झायटीवर मात करण्यात उपयोगी ठरतील.

Logged in user's profile picture