या मदर्स डे ला असं करा सरप्राईझ - काही सर्जनशील टिप्स आणि कल्पना
7 minuteRead
 
                                    
                                
या मदर्स डे ला आपल्या आईनं कसं सरप्राईझ करायचे सुचत नाहीये का? आजच वाचा -
मे चा महिना तीव्र उन्हाळा, आंबे, फणस आणि आईस-क्रीम या गोष्टींची आठवण करून देतो, पण एक महत्वपूर्ण दिवस नक्की आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे - तो म्हणजे मदर्स डे. ती तुमची आई असू शकते, तुमची आजी किंवा सासूबाई असू शकतात. मदर्स डे या सर्व माउलींमुळे महत्वाचा आहे, त्यामुळे 'कुछ तो सरप्राईझ बंता है." म्हणून, आज आपण जाणून घेउ कि तुम्ही तेच, तेच बोरिंग गिफ्ट्स न देता हा मदर्स डे सर्जनशिलपणे कसा साजरा करू शकता.
आम्हाला खात्री आहे या टिप्स तुम्हाला नक्की आवडतील. तर मग, होऊया सज्ज.
१. आईच्या आवडीचे जेवण किंवा नाश्ता बनवा (किंवा ऑर्डर केलात तरी चालेल). 🍽 🥞
तुमच्या मम्मीला काय आवडते, हे तुम्हाला माहीतच असेल. मग चला बनवूया त्यांच्या आवडीचे जेवण आणि करूया आज माउईला सरप्राईझ. अच्छा, तेवढा वेळ नाहीये का आणि मम्मीला सोबत पण द्यायची आहे का? मग तिचे आवडीचे जेवण किंवा नाश्ता ऑनलाईन ऑर्डर करा. म्हणजे सकाळी तिला 'आज काय बनवू' हा प्रश्न पडणार नाही आणि आपल्याच आवडीचे जेवण बघून खूप स्पेशल वाटेल.
तुम्ही तिला तिच्या आवडीच्या रेस्टॉरंट मध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. डिनर नाईट, हा एक चांगला प्लॅन आहे. पण, तिच्या आवडीचे रेस्टॉरंट ह! रिझर्वेशन करून ठेवा आणि तिच्या नजरेसमोर बिल येता कामा नये, याची आधीच दखल घ्या.
२. गिफ्ट बास्केट (पण तिच्या आवडीच्या गोष्टींनी भरलेली). 🎁📦
मदर्स डेला फुले देऊ कि चॉकलेट्स, कि तिच्या आवडीचे परफ्युम कि बॉडी मिस्ट, या प्रश्नात जर तुमचे मन गुंतले असेल, तर गिफ्ट बास्केट हि एक छान कल्पना आहे. काही ब्रॅण्ड्स मदर्स डे-विशेष म्हणून गिफ्ट बास्केट्स उपलब्ध करतात. जर तुमची मम्मी एका विशिष्ट ब्रॅण्ड ची फॅन असेल, तर तुम्ही तिला त्या कंपनीची गिफ्ट बास्केट भेट देऊ शकता. नाहीतर तुम्ही स्वतः वेगवेगळ्या गोष्टी वापरून एक गिफ्ट बास्केट तयार करून भेट देऊ शकता. तिला आवडणारी फुले, परफ्युम, एखादे पुस्तक, आणि तिच्या आवडीचे कूकीज, अशा रीतीने तुमचे गिफ्ट बास्केट तयार होईल, जे तुमच्या आईंना खूप आवडेल.
३. क्लीनिंग प्रोफेशनलना बोलवून घर स्वच्छ करून घ्या. 🏠
जर तुमची मम्मी फ्रेंड्स मधील मोनिका-सारखी आहे, आणि तिला ट्रीट म्हणून वरण-भात हि चालेल, पण घर स्वचछ लागते आणि त्यासाठी तुम्हाला बऱ्याच वेळेला ओरडते, तर आजच तिचा हट्ट पूर्ण करा! नाही, नाही, तुम्हाला वेळ आणि सगळी ऊर्जा घालवून घर चापूनचोपून स्वच्छ करण्याची गरज नाही.
तुम्हाला ऑनलाईन बरेच क्लीनिंग कंपनीज सापडतील जे तुमच्या बजेट मध्ये तुम्हाला संपूर्ण घर स्वच्छ करून देतील. जरा कल्पना करा, तुमच्या आईने घरी पाऊल ठेवताच ते सुंदर, चकचकीत असेल! तिच्यासाठी नक्की हा सर्वोत्तम मदर्स डे होईल. मग जास्त बजेट चा विचार करू नका, मम्मीची लाडकी व्हायचं आहे ना!
४. आईसाठी एक कविता किंवा गाणे लिहा (पण चॅट- जी.पी.टी. शिवाय ह!) 🎼
तुम्हाला कविता लिहायला आवडत असतील तर तुम्हाला हि टीप सहज करता येईल. पण जर येत नसेल, तर काही हरकत नाही. चॅट -जी.पी.टी चा वापरू शकता. आमचा सल्ला असा आहे कि कॉपी करण्यापेक्षा थोडीशी मेहनत घ्या आणि मस्तपैकी बहरून जाऊ दे मेहफिल! छानसे ग्रीटिंग कार्ड विकत घ्या आणि सुरेख हस्ताक्षरात तुमची कविता लिहा. गाणे पण लिहू शकता आणि गाऊ शकता. आईच्या चेहऱ्यावरील ते निर्मळ हास्य कॅमेरातून टिपायला विसरू नका!
५. दोघींसाठी स्पा अपॉइंटमेंट किंवा एखादा क्लास बुक करा. 💆📕
आईंना काय हवे असते? थोडीशी विश्रांती आणि थोडासा स्वतः साठी वेळ. मग स्पा मधील एखाद्या मसाज बुक करण्यात काही हरकत नाही. एका सेशननेच तिला खूप अराम वाटेल आणि दिवसभरचा थकवा निघून जाईल.
जर तुमच्या आईंना शिकण्याची आवड असेल पण काही कारणांमुळे ते जमत नसेल, तर या मदर्स डे ले हा योग जुळून आणा. तिच्या आवडीचा कूकिंग क्लास, किंवा पेन्टींग क्लास, पॉटरी वर्कशॉप बुक करा.
तुम्ही दोघीपण जाऊ शकता किंवा तिचा क्लास बुक करू शकता.जर तुमच्या आईंना खूप आवड असेल, तर त्यांना तुमचे हे गिफ्ट मनापासून छान वाटेल.
६. डेट विथ मॉम. 📆
जर तुमची आई सारखी कुरकुर करत असेल कि, "तुझ्याकडे माझ्यासाठी वेळच नसतो. सारखे आपले ते ऑफिस नाहीतर अभ्यास, आणि ते नसेल, तर मोबाईल. तुझ्याशी दोन शब्द बोलायला आता तुझी अपॉइंटमेंट घ्यावी लागणार का?" असे गोड टोमणे तुम्ही सतत ऐकत असाल, तर हा मदर्स डे फक्त आईसाठी राखून ठेवा.
आईबरोबर डेट प्लॅन करा. आता हे डिनर नाईट पेक्षा थोडे वेगळे आहे. यात तुम्ही मूवी बघायला जाऊ शकता, मॉल मध्ये हवी तेवढी शॉपिंग करायला जाऊ शकता, किंवा पार्लर मध्ये एक फेशियल करून घेऊ शकता.
आणि जर तुम्हाला यातले काहीच करायचे नसेल आणि मनसोक्त गप्पा मारायच्या असतील, तर थेट एखादं कॉफी शॉप गाठा आणि मस्त गप्पा मारा. यात कोणाचा व्यत्यय नको, आणि काही वेळेचे बंधनहि नाही.
कॉफी, मी आणि मॉम - असा बेत ठेवा. आणि या मध्ये, एक दोन सेल्फी घ्यायला हरकत नाही!
७. घरापासून लांब राहूनहि साजरा करता येतो मदर्स डे.
घरापासून लांब राहता का? यावर्षी मदर्स डे ला आईंना भेट देऊ शकत नाही का? डोन्ट वरी. आमच्याकडे तुमच्यासाठी मस्त कल्पना आहेत.
तुमच्या मातोश्रींच्या आवडीची गाणी माहीत आहेत का? त्यांना जर गाणी ऐकायला आवडत असतील तर एक मिक्सड टेप बनवून पाठवा. किंवा तुमच्या दोघींच्या आवडीच्या गाण्यांची मिक्सइड टेप 🎵 बनवू शकता. म्हणजे ती गाणी ऐकताना आईंना तुमच्या बरोबर असलेल्या क्षणांची आठवण होईल. मिक्सड टेप ची कल्पना जरी खूप जुनी असली तरी भावनायुक्त आहे.
मदर्स डे ला कॉल करून विश करण्याऐवजी व्हिडिओ मेसेज पाठवा. व्हिडिओ 📼मध्ये जास्त खोलपणे भावना व्यक्त करता येतात आणि तुमच्या आईंच्या मनापर्यंत पोहोचता येते. व्हिडिओ मेसेज बघितल्यावर ती तुम्हाला नक्की कॉल करेल, पण सरप्राईझ म्हणून व्हिडिओ नक्की पाठवा. आधी ठरवा कि तुम्हाला आईंना काय सांगायचे आहे, आणि मग रेकॉर्ड करा. थोडे भावनिक व्हा, थोडी मजेशीर गोष्ट पण सांगा!
तर मग, कशा वाटल्या या मदर्स डेच्या सरप्राईझ कल्पना. तुम्हाला कोणती आवडली आणि तुम्ही या मदर्स डेला तुमच्या आईंना कसे विश करणार आहेत. आमच्याशी शेर करा. 😊
Write, Record and Answer! Consume Unlimited Content! All you need to do is sign in and its absolutely free!
Continue with one click!!By signing up, you agree to our Terms and Conditions and Privacy Policy.
 
                


 
                                 
                                     
                                     
                                     
                                     
                                    