कडाक्याच्या थंडीसाठी सेल्फ केअर टिप्स
6 minuteRead
 
                                    
                                
(You can read this blog in English here)
हिवाळा हा ऋतू तसा वादाचा विषय आहे! काहींना या ऋतूतला प्रत्येक दिवस आवडतो, तर काहीना बस पुढचा ऋतू केव्हा येतो असे झालेले असते. हा ऋतू काही लोकांना निस्तेज आणि इतरांना रोमांचक आणि आनंददायक वाटतो. तुमची पसंती काहीही असो, हिवाळ्यात स्वतःची काळजी घेणे महत्वाचे ठरते. कोरडेपणा, डिहायड्रेशन आणि आळस या सामान्य समस्या आहेत ज्यांना थंड हिवाळ्याच्या महिन्यांत आपल्याला सामोरे जावे लागते. हिवाळ्यातील तुमच्या सर्व समस्यांशी लढण्यासाठी इथे काही सेल्फ केअर टिप्स दिल्या आहेत!
मॉइश्चरायझ , मॉइश्चरायझ आणि मॉइश्चरायझ :
हिवाळ्यामुळे तुमची त्वचा खूप कोरडी आणि फ्लेकी होऊ शकते. हिवाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्वचा मॉइश्चराइझ्ड आणि हायड्रेटेड ठेवणे! चेहरा आणि शरीर कोमल ठेवण्यासाठी जाड क्रीम-बेस्ड मॉइश्चरायझर शोधा. मॉइश्चरायझिंग केवळ कोरडेपणावरच उपयुक्त ठरते असे नाही तर हिवाळ्यात मॉइश्चरायझिंग केल्यानेही तुम्हाला नितळ चमकदार आणि निरोगी त्वचा मिळू शकते. कडक, थंड हवामानामुळे त्वचेची छिद्रे आकुंचन पावतात, त्यामुळे त्यात घाण अडकून राहते आणि परिणामी पिंपल्स होतात. थंडीच्या कडाक्यात एक चांगले मॉइश्चरायझर तुमचा विश्वासू साथीदार ठरू शकते.
स्वतःला हायड्रेटेड ठेवा:
केवळ बाह्य हायड्रेशन पुरेसे नाही! हिवाळ्यात आतून सुद्धा हायड्रेशन आवश्यक असते. या काळात तुम्हाला फार तहान लागणार नाही किंवा एखादा ग्लास थंडगार पेय प्यावेसे वाटणार नाही. पण याउलट, हिवाळ्यात भरपूर पाणी प्यायल्याने तुम्ही उबदार राहू शकता आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकता. एवढेच नाही! तर अंतर्गत हायड्रेशनमुळे त्वचा अधिक चांगली, निरोगी आणि चमकदार बनते!
आरामदायी, उबदार कपडे घाला:
हे वेगळे सांगायला नको! थंडगार हवामानात सगळ्यांनाच त्यांच्या उबदार आणि आरामदायी पायजमा सेटमध्ये लोळत पडायचं असतं. जसजसे तापमान कमी होईल तसतसे, तुमच्या बेडच्या बॉक्समध्ये पडलेले तुमचे सर्व लोकरीचे कपडे बाहेर काढण्यासाठी सज्ज व्हा. हे कपडे तुमचे बाहेरील कडक हवामानापासून संरक्षण करतील आणि तुम्हाला उबदार ठेवतील. तुमच्या पावलांसाठी सुद्धा ‘फरी’ सॉक्सच्या काही जोड्या हाताशी ठेवा.
बाहेर चालायला जा:
या आळस आणणाऱ्या ऋतूत तयार होऊन बाहेर जाणे कष्टाचे वाटू शकते. गोठवणाऱ्या थंड हवामानात कोणाला आपले ब्लँकेट सोडून घराबाहेर वेळ घालवावासा वाटेल? पण शूज घालून काही शारीरिक अॅक्टिव्हिटीजसाठी तुम्ही बाहेर पडायलाच हवे! हिवाळ्यात तुम्हाला उबदार आणि उत्साही ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे व्यायाम. या हवामानाचा सर्वात चांगला भाग म्हणजे ते तुम्हाला अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत करते ज्यामुळे वजन कमी होते.
स्वत: चे लाड पुरवा:
हिवाळ्यात आंघोळ करणे हे प्रत्येकासाठी कठीण काम आहे. शरीरावर पाण्याचा एक थेंबही पडण्याचा विचार तुम्हाला थंडी वाजवू शकतो. पण हिवाळ्यातल्या थंड दिवसात हॉट बबल बाथची काही मजाच निराळी असते. हिवाळ्याच्या हंगामात स्वतःचे चांगले लाड करा. आपल्या त्वचेची चांगली काळजी घ्या, छान आंघोळ करा, स्वतःसाठी चॉकलेट मिल्क, चहा किंवा कॉफीचा गरम कप बनवा, काही मेणबत्त्या लावा आणि आनंद घ्या! तुम्ही तुमच्या खोलीला पुन्हा सजवणे किंवा कपाट नीट लावण्यासारख्या मजेदार अॅक्टिव्हिटीज सुद्धा करू शकता.
उन्हात जास्त वेळ घालवा:
गोठवून टाकणाऱ्या थंडीत सूर्यप्रकाशात स्नान करण्यापेक्षा चांगले काय आहे? परंतु लोक सहसा घरामध्येच वेळ घालवतात, ज्यामुळे सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर (एस.ए.डी. - सॅड) होऊ शकतो. हा विकार सूर्यप्रकाशाशी कमी संपर्क आल्यामुळे होतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी उन्हात जास्त वेळ घालवा. या एक्सपोजरमुळे तुम्हाला व्हिटॅमिन डी सुद्धा पुरेशा प्रमाणात मिळू शकते. पण त्वचेला सनस्क्रीन लावण्यास विसरू नका!!
तुमचे झोपेचे वेळापत्रक सेट करा:
हिवाळा हा आळस आणणारा ऋतू आहे आणि त्यामुळे तुम्हाला दिवसभर अस्वलासारखे झोपून राहावेसे वाटू शकते. या आळसामुळे तुमच्या झोपेचे वेळापत्रक बिघडू शकते आणि जास्त झोप येऊ शकते. जास्त झोपेमुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो आणि त्यामुळे मूड बिघडणे, मधुमेह आणि काही हृदयविकार यांसारख्या परिस्थिती उद्भवू शकतात. त्यामुळे हिवाळ्यात झोपेचे वेळापत्रक चांगले असणे गरजेचे आहे.
'लेयरिंग'ची कला शिकून घ्या:
प्रत्येक ऋतूत आपण छान दिसावे असे कोणाला वाटत नाही ? पण हिवाळ्यात फॅशन अवघड ठरू शकते. या ऋतूमध्ये 'फॅशनपेक्षा आरामदायीपणा बरा' किंवा 'आरामदायीपणापेक्षा फॅशन' हवीशी वाटू शकते. आणि म्हणून लेयरिंगची कला (एकावर एक साजेसे कपडे घालणे) शिकण्याची हीच वेळ आहे! सर्वोत्कृष्ट दिसण्यासाठी गोठवून टाकणाऱ्या थंडीत एखाद्या सोहळ्यात कुडकुडत उभे राहण्याची तुम्हाला गरज नाही. हिवाळ्यातील कपडे कसे 'लेयर' करायचे ते शिका आणि तुमचा ‘स्टाईल कोशंट’ वाढवा!
अनुवाद: अन्योक्ती वाडेकर Translated by Anyokti Wadekar
Write, Record and Answer! Consume Unlimited Content! All you need to do is sign in and its absolutely free!
Continue with one click!!By signing up, you agree to our Terms and Conditions and Privacy Policy.
 
                


 
                                 
                                     
                                     
                                     
                                     
                                    