डिंकाच्या लाडूचे फायदे

7 minute
Read

Highlights या थंडीमध्ये डिंकाचे लाडू का खावे जरूर वाचा ......

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

गुलाबी थंडीची मज्जा काही औरच आहे! मस्त गरमागरम चहा आणि नाश्त्यासाठी आलू पराठा - असा बेत नक्की करून पहा. 😋 पण थंडीसोबत येते हातापायांचे दुखणे, सांधेदुखी, थकवा, आळस आणि बऱ्याच काही तब्येतीच्या कुरकुरी. म्हणूच आज आपण जाणणार आहोत डिंकाच्या लाडवांचे महत्त्व.

डिंकाच्या लाडवांची कृती तुम्हाला इंटरनेट वर मिळेल. या लाडवांमध्ये डिंक, गव्हाचे पीठ, दूध, तूप, सुकामेवा, गुळ, सुके खोबरे, आणि वेलची यांचा वापर केला जातो. लाडू मऊ आणि चवीला गोड असतात, आणि तोंडात सहजच विरघळतात.

हो, आपण बरोबर ओळखलं. डिंकाचे लाडू हे मुख्यतर गरोदर महिला व बाळंत आईंना दिले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का? डिंकाचे लाडू हे लहान व मोठे, सर्वांसाठी उपयुक्त आहेत. आज आपण हेच जाणून घेणार आहोत.

सर्वात पहिले आपण बघूया कि डिंकाच्या लाडवांमध्ये असे काय दडले आहे? आपली आजी 👵 नेहमी म्हणते, "नाश्ता करायला जमणार नसेल तर एक डिंकाचा लाडू तरी खाऊन जा. पोट भरेल आणि दिवसभर भूकभूक होणार नाही. पौष्टिक आहे गं!" पण आजी असं का म्हणते ते आपण बघूया.

१.  डिंकाचे लाडू म्हणजे 'हेल्दी' कॅलरीस चा खजिना. यात असतात भरपूर प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम आणि मॅग्नेशियम सारखे धातू. मॅग्नेशियम हे त्या स्त्रिया आणि मुलींना गरजेचे आहे ज्यांना मासिक पाळीचा खूप त्रास होता. पीरिअड्स च्या आधी ज्यांना चॉकोलेट चे क्रेविंग होतं ना, त्यांनी चॉकलेट्स खाण्याऐवजी एक डिंकाचा लाडू खावा. बघा, नक्की मूड स्वीन्ग्स कमी होतील व काम करायला छान वाटेल. फक्त डिंकाचे लाडू बनवताना साखरेऐवजी गुळाचा वापर करावा. म्हणजे अजूनच पौष्टिक!

gond ka laddoo

२.  थंडी मध्ये ताप, सर्दी, खोकला, सीझनल फ्लू, इन्फेकशन्स चा पटकन प्रसार होतो.😨🤒 डिंकाचे लाडू एका कवचचे काम करते, आणि तुम्हाला आतून उबसुद्धा मिळते. थंडी कमी वाजते आणि पटापट काम करावसं वाटतं. थंडी मध्ये काहींना थकवापण जाणवतो. आणि ज्या स्त्रिया बिझी असतात, त्यांना कधीकधी नाश्ता करायचा किंवा संध्याकाळच्या वेळी काहीतरी मिड-स्नॅक करायला वेळ मिळत नाही. त्यांनी थकवा टाळण्यासाठी आणि ऊर्जा मिळवण्यासाठी छोट्याश्या डब्यात एक डिंकाचा लाडू नक्की ठेवावा. मिटींग्स च्या मध्ये पाच मिनटं मिळतात ना, तेव्हा पटकन खाऊन घ्या. थकवा तर नाहीसा होतोच, पण स्टॅमिना वाढतो आणि शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते.🏋️‍♀️

 

३.  वेट लॉस करायचा आहे का? त्यांनी डिंकाचे लाडू नक्की खावेत. नाही, अजिबात वजन वाढणार नाही. आम्ही गॅरंटी देतो. डिंकामधे 'एम्प्टी' कॅलरीज नसतात. खरंतर, डिंकाचा लाडू 'हेल्दी' कॅलरीज ने परिपूर्ण असतात. म्हणूनच तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. तुम्ही ठराविक कॅलरीज 'कंझ्युम' करता आणि वजन आटोक्यात राहतं. तुम्हाला ऊर्जा सुद्धा मिळते, त्यामुळे 'वेट लॉस डाएट' चा थकवा अजिबात जाणवत नाही. आणि हो, तुम्ही छान सडपातळ होणार हा!

a measuring tape over a scale

४. मग डिंकाचे लाडू हे फक्त महिलांसाठीच उपयुक्त आहेत का? आम्हाला विचाराल तर आम्ही डिंकाच्या लाडूचे अजून फायदे सांगू शकतो. थंडीमध्ये किंवा इतर वेळी काहींना पोट साफ होण्यामध्ये समस्या होतात. त्यामुळे दिवसभर अस्वस्थ वाटतं आणि उगाच त्रिफळा चूर्ण किंवा इतर रेचक चा वापर केला जातो. हे रेचक जरी प्रेभावी असतील तरी त्यावर अवलूंबून राहण्यात काहीच तथ्य नाही. त्यापेक्षा आपण आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा संभाळाव्यात आणि फायबर चा समावेश करावा. आधीच सांगण्यात आले आहे कि डिंकामधे फायबर चे प्रमाण भरपूर आहे आणि तुम्हाला पोट साफ होण्यात काही 'प्रॉब्लेम' नाही होणार. तुम्हाला जाणवेल कि तुमचे नियमित पोट साफ होते आहे आणि अस्वस्थ वाटत नाही. तुम्हाला दिवसभर उत्साह वाटतो आणि तुमची 'स्किन' 'ग्लो' होताना जाणवेल. कॉन्स्टिपेशन चा त्रास फक्त महिलांनाच नाही तर सर्वांना होतो. आणि थंडीमध्ये याचा त्रास जास्त जाणवतो. म्हणून तुम्ही डिंकाचे लाडू बनवून तुमच्या घरामध्ये सर्वाना देऊ शकता. लहान किंवा मोठे - सगळ्यांना लाडवाचा फायदे जाणवतील. चूर्णाची बाटली किंवा डॉक्टरकडे जाण्याऐवजी एक डिंकाचा लाडू रोज सकाळी खावा.😊

 

५.  डिंकाचे लाडू आणि ज्येष्ठ नागरिक? हो, त्यांनी पण नक्की खावेत ह डिंकाचे लाडू. 👴👵का? ते आता आपण बघूया. डिंक शरीराचा दाह कमी करतो. ज्यांना पाठदुखी किंवा गुडघे दुखी याचा त्रास होतो, त्यांनी डिंकाचा समावेश रोजच्या आहारात करावा. ज्यांना सांधे दुखी किंवा अर्थराइटिस चा त्रास आहे, त्यांनी डिंकाचा लाडू खायला चुकू नये. तुम्हाला थोडे दिवसातच जाणवेल कि तुमचे स्नायू बळकट होत आहेत. आणि दुखणे कमी झाले आहे. थंडीमध्ये दुखण्याचा त्रास जास्त जाणवतो आणि जर तुम्हाला नुकतेच फ्रॅक्चर झाले असेल, तर त्रास खूपच होईल. डिंकाचा लाडू खा आणि फायदे अनुभवा. डिंकामुळे हाडे आणि उती बळकट होण्यात उपयोग होतो. म्हणून, सर्वानीच चांगल्या तब्येतीसाठी डिंकाचा लाडू खावा.

 

६.  आजकाल लहान मुलांमध्ये चष्म्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे.🤓 स्मार्टफोन, टॅबलेट, कॉम्पुटर, लॅपटॉप याचा वापर ऑनलाईन लर्निंग साठी केला जातो. यात मुलांची चूक नाही. पण आपण त्यांच्या डोळ्यांची काळजी नक्की घेऊ शकतो. दर वीस मिनिटांनी मुलांना 'ब्रेक' घ्यायला सांगा आणि पौष्टिक आहार द्या. यात डिंकाचा लाडवाचा समावेश नक्की करा कारण डिंक हा डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायेदशीर आहे. त्याचप्रमाणे, ज्या भाज्या आणि पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण जास्त आहे, त्या भाज्या मुलांना नक्की खाऊ घाला.

a lady working on a laptop

७.  शेवटी, आपण बघूया डिंकाच्या लाडवांचा बाळंत आणि गरोदर महिलांना कसा उपयोग होतो. बाळंत महिलांना जास्त कॅलरीजची गरज असते. बाळासाठी दूध बनवण्यात ऊर्जा खर्च केली जाते. त्याचप्रमाणे, 'रिकव्हरी' साठी पौष्टिक आहाराची गरज असते. म्हणून बाळंत महिलांना डिंकाचे आणि मेथीचे लाडू देण्यात येतात. डिंकामधे 'हेल्दी फॅट', प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्याचा फायदा बाळंत आणि गरोदर महिलांनी घ्यावा. पाठदुखी कमी होते, हाडे मजबूत होतात, आणि महिलांना उत्तम पोषण मिळते.

 

तर, असे हे डिंकाच्या लाडवांचे फायदे. सर्वानी नक्की लाडवाचा समावेश आपली आहारात करावा आणि थंडीपासून बचाव करावा. चवीला हि छान, आणि आरोग्यासाठी उत्तम! 😋

Logged in user's profile picture