५ प्रेरणादायी महिला आणि त्यांच्या असामान्य कथा

9 minute
Read

Highlights

जाणून घेऊया काही प्रेरणादायी महिल्यांच्या कथा -

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

आर. के. लक्ष्मण यांचे नाव नक्कीच ऐकण्यात आले असेल. ते प्रसिद्ध लेखक आणि कार्टूनिस्ट होते. ते त्यांच्या ‘द कॉमन मॅन’ निर्मितीसाठी आणि १९५१  मध्ये सुरू झालेल्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये ‘यू सेड इट’ या त्यांच्या दैनिक व्यंगचित्रासाठी प्रसिद्ध आहेत. आजही कॉमन मॅन वाचकांना आवडतं.

तर एकदा आर. के. लक्ष्मण यांना विचारण्यात आलं कि “कॉमन मॅनच का? तुम्ही कधी स्त्रीवर का लिहिले नाही? तुम्हाला कधी वाटले का तुम्ही कॉमन वूमन बद्दल लिहिले पाहिजे?"

तेव्हा, आर. के. लक्ष्मण स्मितहास्य करून म्हणाले, "मॅन कॉमन असू शकतो. पण प्रत्येक स्त्री हि स्पेशल असते. ऑल वूमेन आर स्पेशल."

सर्व स्त्रिया कर्तृत्वाने महान असतात. आज आपण अशाच काही कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी स्त्रियांबद्दल जाणून घेणार आहोत. तर चला मग, आज आपण त्यांच्या असामान्य कथांबद्दल जणून घेऊया.

१. सुधा मूर्ती.

सुधा मूर्ती याच्याबद्दल कितीहि वर्णन केले तरी कमीच आहे. तशी त्यांची ओळख सगळ्यांना आहेच. त्या कोण आहेत, काय करतात, हे माहीतच असेल पण हि ब्लॉग पोस्ट त्यांचा वर्णनाशिवाय अपूर्ण आहे.

सुधा मूर्ती या एक इंजिनियर, शिक्षिका, लेखिका, आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. त्यांनी मुलांसाठी व मोठ्यांसाठी बरीच पुस्तके लिहिली आहेत. कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्या प्रामुख्याने परोपकारी कार्यासाठी ओळखल्या जातात.

एकदा त्यांनी टेलको कंपनीची ऍड वाचली. त्यात स्पष्टपणे लिहिले होते कि महिलांनी अप्लाय करू नये. त्यांना ते पटले नाही आणि त्यांनी तरीही अप्लाय केले आणि त्यांना नौकरी  मिळाली.

अशा त्यांच्या बऱ्याच प्रेरणादायी गोष्टी आहेत ज्यांनी आपल्याला आयुष्य जगण्याची चालना मिळते. त्या इंजिनीरिंग कॉलेज मध्ये एकट्या स्त्री होत्या. तेव्हा, बऱ्याच मुलांनी त्यांना त्रास दिला. "लग्न करून पोळ्या लाटा,' असेही अपमानास्पद बोलण्यात आले. तरीही त्यांनी जिद्द नाही सोडली आणि शिक्षण पूर्ण केले.

त्यांनी एकदा ठरवले कि आपण देवदासींच्या मुलांसाठी काही चांगले कार्य केले पाहिजे. जेव्हा त्या सोशल वर्कर म्हणून गेल्या, तेव्हा देवदासींना त्यांच्यावर दगडफेक केला. दुसऱ्यांदा जेव्हा त्यांनी पोहोचण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना धमकावण्यात आले. तरीही त्यांनी धीर सोडला नाही. मूर्तींच्या वडिलांनी सुचवले, “तू आधी त्यांच्याशी मैत्री कर, संवाद साध आणि मग तेच तुझ्याकडे मदत मागतील.” त्यांनी बरेच दिवस असे केले आणि हळूहळू देवदासी त्यांचं ऐकू लागल्या आणि मुलांना शिक्षणासाठी पाठवू लागल्या.

तुम्ही त्यांच्या आयुष्यातील कोणतीही गोष्ट वाचली, तर तुम्हाला खूप प्रोत्साहन आणि हिम्मत मिळेल.

२. सिंधुताई सपकाळ

सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. त्यांना 'माई' म्हणून ओळखले जाते. तुम्हाला ‘स्ट्रॉंग वूमन; चे उदाहरण पाहिजे असेल, तर सिंधुताई सपकाळ हे एक उत्तम नाव आहे. त्या शक्तिशाली आणि तेवढ्याच स्वभावाने गोड होत्या. त्यांच्यावर खूप वाईट प्रसंग आले, पण त्यांच्याशी बोलताना समजते कि माईंमध्ये कोणतीही नकारात्मक भावना नाही. त्यांना नारी शक्ती पुरस्कार आणि बरेच काही पुरस्कार देण्यात आले. पण त्यांनी आपले महान कार्य चालू ठेवले.

जेव्हा त्यांना घरातून काढून टाकण्यात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःची काळजी घेतली. त्यांनी पाहिले कि रस्त्यावर आणि रेल्वे स्टेशनवर बरीच अनाथ आणि बेघर मुले भुकेने बेचेन आहेत. त्यांनी त्या मुलांसाठी भीक मागायला सुरुवात केली. त्यांनी हजार पेक्षा जास्त अनाथ मुलांना दत्तक घेतले आणि त्यांना चांगले शिक्षण हि दिले. आज पुण्यात त्यांचे अनाथाश्रम चालू आहे. तिथे ३०० पेक्षा जास्त मुलांची काळजी घेतली जाते. आज त्या आपल्या सोबत , या जगात नाही, पण त्यांचे हे विशाल कार्य आपण कधीच विसरू शकत नाही.

जर तुम्हाला कधी वाटले कि तुमच्याकडे काहीच नाही किंवा कुणाची साथ नाही, तर तुम्ही सिंधुताई सपकाळ यांची कहाणी नक्की वाचा.

३. अरुणिमा सिन्हा.

जेव्हा आपल्याला वाटते कि आपण सर्व गमावून बसलो आहे, तेव्हाच आयुष्याचा दुसरा टप्पा सुरु होतो. असे तुम्हाला अरुणिमा सिन्हाची कहाणी वाचून नक्की वाटेल. १२ एप्रिल २०११ ला अरुणिमा लखनौ येथून दिल्लीला जात होती. पण काही गुंडांनी तिच्यावर हल्ला केला आणि तिच्या गळ्यातील चैन खेचायचा प्रयत्न केला. तिने खूप विरोध केला, त्यांची हातापायी झाली आणि अखेर, त्यांनी तिला चालत्या ट्रेन मधून बाहेर फेकले. तिचा एक पाय ट्रेन खाली चिरडला गेला आणि ती काही करू शकली नाही. तिला वाचवायला कुणी आले नाही कारण रात्रीच्या वेळी कुणाला ती दिसत नव्हती. तिला स्पष्टपणे दिसत होते कि तिचा पाय उंदीर येऊन चावत आहे, पण ती उठूही शकत नव्हती.

शेवटी, तिला तिचा पाय गमवावा लागला. पण आपण अजून जिवंत आहोत, याची तिला जाणीव होती आणि परत मिळालेल्या आयुष्याचा आदर करायचा, असे तिने ठरवले.

ती स्पोर्ट्स वूमन तर होतीच, पण तिने माऊंट एवरेस्ट चढण्याचा प्रयास केला आणि तो पूर्णहि केला. ती जगातील पहिली अपंग महिला ठरली जिने सर्वात उंच शिखर, एवरेस्ट पादांक्रात केले आहे. तिच्या बरोबर इतकी तीव्र घटना घडली, तरीही तिने ‘व्हिक्टिम झोन’ मध्ये न राहण्याचा निर्णय घेतला. आपल्या परिस्थितीला चॅलेंज करीत त्यांनी एवरेस्ट गाठले.

"कोण या एक पाय नसलेल्या मुलीशी लग्न करणार," असे बऱ्याच लोकांनी ती जेव्हा अपघातातून बाहेर पडली तेव्हा उद्गारले. पण अरुणिमा सिन्हा ने आपले अस्तित्व ठामपणे सिद्ध केले.

४. लक्ष्मी अगरवाल.

दीपिका पदुकोणचा ‘छपाक’ सिनेमा आपण पहिला असेल किंवा ऐकण्यात आला असेल. हा सिनेमा लक्ष्मी अगरवाल नावाच्या मुलीच्या आयुष्यावर आधारित आहे.

मुलींना आपल्या चेहऱ्याची, सुंदरतेची खूप काळजी असते. एक छोटासा पिंपल जरी आला, तरी किती कॉन्शस होतात? पंधराव्या वर्षी लक्ष्मी च्या चेहऱ्यावर एका मुलाने ऍसिड हल्ला करून तिला विद्रुप करण्याचे ठरवले.

लक्ष्मी ऍसिड अटॅक सर्वायवर तर झाली, पण तिने त्या क्रूर मुलाला धडा शिकवला. तिने कोर्टाची पायरी चढली आणि न्याय मिळवला. त्यानंतर, तिने ऍसिड अटॅक सर्वायवर मुलींसाठी प्रचारक बनली.

त्या मुलाने तिचा चेहरा विद्रुप करायचा प्रयत्न केला, पण तो तिचे मन, अंतर्गत सौंदर्य आणि तिचे धैर्य कधीच मोडू शकला नाही.

५. माया विश्वकर्मा.

अक्षय कुमारचा ‘पॅड मॅन’ सिनेमा बघितला असेलच, पण तुम्हाला भारतातली ‘पॅड वूमन’ माहीत आहे का? हो, त्या आहेत - माया विश्वकर्मा. त्या बऱ्याच वर्षांपासून मेन्स्ट्रुअल हायजिन या गंभीर विषयावर काम करत आहेत. मासिक पाळीबद्दल आपल्या देशात मोकळेपणाने बोलले जात नाही. म्हणून, काही स्त्रिया उत्तम दर्जाचे प्रॉडक्ट्स किंवा पॅड्स वापरात नाही आणि त्यांना बऱ्याच आजारांना सामोरं जावं लागत. हे सगळे पाहूनच माया यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणींकडून पैसे सुद्धा उधार घेतले, बऱ्याच अडथाळांचा सामना केला, पण त्यांनी माघार घेलती नाही.

त्या सध्या आदिवासी गावांमध्ये काम करतात. त्या म्हणाल्या कि या गावांमध्ये फक्त भाषण देऊन किंवा पोस्टर लावून किंवा पॅड मॅन सिनेमा दाखवून काम होत नाही. प्रत्यक्ष फिरावं लागतं आणि प्रत्येक स्त्रीलाआणि मुलीला समजून द्यावं लागतं.

तर या सर्व प्रेरणादायी स्त्रियांना सलाम! या सर्व महिला सर्वसामान्य आहेत पण त्यांनी जगावेगळ्या अडचणींवर मात केली. प्रत्येक स्त्रीकडून नक्की शिकण्यासारखे आहे.

Logged in user's profile picture

सुधा मूर्ती कोण आहे?
सुधा मूर्ती या एक इंजिनियर, शिक्षिका, लेखिका, आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. त्यांनी मुलांसाठी व मोठ्यांसाठी बरीच पुस्तके लिहिली आहेत. कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्या प्रामुख्याने परोपकारी कार्यासाठी ओळखल्या जातात
प्रेरणादायी भारतीय महिला कोण आहेत?

सुधा मूर्ती

सिंधुताई सपकाळ

अरुणिमा सिन्हा.

लक्ष्मी अगरवाल.

माया विश्वकर्मा.

भारतातली ‘पॅड वूमन’ कोणाला म्हणतात?
माया विश्वकर्मा