झटपट कुरकुरीत स्नॅक - कुरकुरे मसाला क्रंच!
2 minuteRead
                                    
                                
(You can read this Blog in English here)
'कुरकुरे' सर्वांचेच आवडते असतात आणि त्याला थोडासा भारतीय  चवीचे चटका दिला तर मग मज्जाच की नाही? म्हणूनच आज आपण बनवणार आहोत एक अत्यंत मजेदार आणि झटपट स्नॅक्स, जो खूप चविष्ट आणि मस्त चटपटीत आहे. त्याशिवाय, हा मजेदार स्नॅक्स, तुम्ही अगदी ५-१० मिनिटांत बनवू शकता!
चला तर मग, रेसिपी पाहूया!
साहित्य:

    •    १ बारीक चिरलेला टोमॅटो 
    •    १ बारीक चिरलेला कांदा 
    •    अर्धा छोटा चमचा लाल तिखट 
    •    अर्धा छोटा चमचा चाट मसाला 
    •    १ पाकीट कुरकुरे 
    •    अर्धे लिंबू 
कृती: 
कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्या 
कुरकुरेमध्ये या बारीक चिरलेल्या भाज्या घाला 
त्यात चाट मसाला आणि लाल तिखट घाला 

वरून लिंबाचा रस पिळा 
हे सगळे साहित्य हलवून अगदी चांगले मिक्स करून घ्या 
भारतीय चवीचे, चवदार, कुरकुरीत मस्त- मसालेदार कुरकुरे तयार आहेत!
ही अत्यंत झटपट आणि सोपी रेसिपी नक्की बनवून पाहा आणि तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कळवा!
अनुवाद: अन्योक्ती वाडेकर  Translated by Anyokti Wadekar 
Write, Record and Answer! Consume Unlimited Content! All you need to do is sign in and its absolutely free!
Continue with one click!!By signing up, you agree to our Terms and Conditions and Privacy Policy.
                

