मकर संक्रांती - एक उत्सव उत्साहाचा आणि उत्सव आनंदाचा!
7 minuteRead
मकर संक्रांत हा भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा एक सण आहे. इंग्रजी महिन्यानुसार वर्षाच्या पहिल्या महिन्यात येणारा आणि मराठी महिन्यानुसार पौष महिन्यात येणारा हा सण. मकर संक्रांती सहसा दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला असते आणि २०२२ मध्ये, देखील 14 जानेवारीलाच हा सण आला आहे. मकर संक्रांती हा सण देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जातो, उदाहरणार्थ, गुजरातमध्ये याला उत्तरायण म्हणतात, त्याच क्षणी तामिळनाडूमध्ये पोंगल आणि हरयाणा आणि हिमाचल प्रदेश माघी म्हणतात.

Source: indiamprint
हा सणहिवाळ्याच्या शेवट आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीस चिन्हांकित करतो. हे हिवाळ्यातील संक्रांतीनंतरचे पहिले सूर्य चिन्ह मकर राशीकडे सूर्याची हालचाल देखील दर्शवते. सर्व घटना सूर्याच्या हालचालीकडे निर्देश करत असल्याने, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची प्रार्थना करून त्याचे आभार मानण्यासाठी देखील हा सण साजरा केला जातो. आणि केवळ इतकंच नव्हे तर, त्याच सोबत मकर संक्रांती लांब रात्रीची समाप्ती दर्शवते आणि संपूर्ण वर्षभरात हा एकच असा दिवस असतो ज्या दिवशी दिवस आणि रात्र समान असतात.

Source: HT
वेगवेगळ्या राज्यांमधे वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांती हा सण अतिशय शुभ मानला जातो कारण तो उबदार दिवसांची सुरुवात असल्याचा प्रतीक मानल्या गेला आहे. लोक त्यांचे पाप धुण्यासाठी पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. महिन्याचा शुभ काळ उत्तरायण म्हणून ओळखला जातो जो मकर संक्रांतीचे दुसरे नाव आहे. लोक सकाळी लवकर उठतात आणि पहाटेच्या उन्हात भिजवण्यासाठी बाहेर पडतात. गुजरात सोबतच महाराष्ट्रामध्ये, लोक त्यांच्या गच्चीवर आणि मैदानावर पतंग उडवतात आणि त्यासाठी स्पर्धाही घेतात.

Source: thelivenagpur
भारतीय राज्यांमध्ये आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात मकर संक्रांती सूर्यदेवाची प्रार्थना करून आणि नंतर गूळ आणि तिळापासून बनवलेले पदार्थ, जसे की तिळगुळाचे लाडू, तिळगुळाच्या वड्या आणि तिगूळच्या पापड्या खाऊन साजरी केली जाते. तिळगुळ देतांना एक प्रकार आज ही महाराष्ट्रात आढळून येते ती म्हणजे तिळगुळ दिल्यावर एकमेकांना, "तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला!" असं म्हणणं. काही भागांमध्ये, लोक खिचडी देखील बनवतात जी तांदूळ आणि मसूर यांचे मिश्रण असते. हा सण साधारणतः एक ते दोन दिवसांचा असतो आणि लोक शुभ प्रसंगी नवीन कपडे घालतात. हे सहसा संपूर्ण समुदायासह मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाते कारण बहुतेक विधी टेरेस, मैदान, नदी किंवा तलावावर, म्हणजेच खुल्या आसमंतात होतात. मकर संक्रांती हा वर्षातील पहिल्या सणांपैकी एक आहे आणि त्यामुळे हा सण ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असतो.

Source: jakpost
खासकरून महाराष्ट्रात आणि त्यातल्यात्यात विदर्भातल्या नागपूर मध्ये, तिळ आणि गुळापासून बनवलेल्या मिठाईची देवाणघेवाण करून संक्रांती साजरी करते. त्या दिवशी सगळेच जण एकमेकांना शुभेच्छा देतात आणि याच भावनेतून ते वर्षभर त्यांची मैत्री टिकवून ठेवण्याचा प्रयत्न देखील करतात. तुमच्या काही समस्या असल्या तरी, या गोड पदार्थांची देवाणघेवाण करून विसरण्याचा आणि क्षमा करण्याचा हा दिवस आहे. कारण त्यातील गोडवा नात्यातील सर्व नकारात्मकता आणि आंबटपणा दूर करेल, या भावनेने संपूर्ण मंडळी तिळगुळ देते. त्यासोबतच लोक पुरणपोळी देखील बनवतात जी शुद्ध तूप टाकलेली गूळ आणि बेसनाने भरलेली चपटी पोळी असते. हे सर्व शरीरासाठी चांगले आहेत कारण हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि आवश्यक ओलावा देण्यासाठी गरम तशीर असलेल्या अन्नपदार्थांची आवश्यकता असते. या पदार्थांमधील घटक शरीरासाठी अगदी उपयोगी पडतात.

Source: wikimedia
महाराष्ट्रात लोक मकर संक्रांत तीन दिवस साजरी करतात आणि प्रत्येक दिवसाचे त्याचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. पहिला दिवस भोगी म्हणून ओळखला जातो. या वेळी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि लोक सकाळी पतंग उडवण्यासाठी घराबाहेर पडतात. दुसऱ्या दिवसाला संक्रांती म्हणतात आणि या दिवशी विवाहित स्त्रिया पारंपरिक पोशाख घालून अगदी सजून धजून, हळद-कुमकुम नावाचा मेळावा करतात ज्याचा अनुवाद हळदी-सिंदूर असा होतो. ते एकमेकांच्या कपाळावर एक हळदी कुंकवाचा ठिपका लावतात जिथे सामान्यतः टिकली लावली जाते आणि एकमेकांना भांडीपासून कपड्यांपर्यंतच्या घरगुती वस्तू भेटवस्तू म्हणून देतात. हा एकत्र जाण्याचा सोहळा सहसा संध्याकाळी होते. शेवटच्या दिवसाला किंक्रांत म्हणतात.

Source: rosetattstone
मकर संक्रांती हा शुभ काळ मानला जातो आणि लोक नवीन वस्तूंची खरेदी देखील करतात. ते या दिवशी विद्येची देवी सरस्वतीचे आभार मानतात आणि आपल्या प्रियजनांना भेटून अभिवादन करतात. हा सण महाराष्ट्र आणि उर्वरित देशातील सर्वात मोठ्या पध्दतीने साजरा केल्या जाणारा उत्सवांपैकी हा एक उत्सव आहे. तुम्ही तुमच्या घरी मकर संक्रांती कशी साजरी करता हे आम्हाला खालील दिलेल्या कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा!
Write, Record and Answer! Consume Unlimited Content! All you need to do is sign in and its absolutely free!
Continue with one click!!By signing up, you agree to our Terms and Conditions and Privacy Policy.


