सर्वांसाठी आदर्श असलेल्या मराठी महिला!
8 minuteRead
                                    
                                
आदर्श महिलांचा बाबतीत तर महाराष्ट्राला दैवी देणगी आहे. सावित्रीबाई फुले, महाराणी ताराबाई, कमला रणदिवे, रजनी भिसे आणि आणखी नावं घेऊ तितकी कमी पडतील. परंतु आज आपण बघणार आहोत काही अश्या स्त्रियांबाबत ज्यांची यशोगाथा ऐकून आपली छाती सुद्धा अभिमानाने भरून येईल. आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण ज्यांनी वेचून वेचून समाजाला अर्पण केला, ज्या स्त्र्यियांना आदर्श मानून आपण जगू शकू, अश्या काही स्त्रियांबाबत आपण आजच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत.
- सुमन मुठे
 
सुमन मारुती मुठे यांचा जन्म 1947 साली झाला, त्या भारतातील नाशिक, महाराष्ट्र येथील सामाजिक महिला कार्यकर्त्या आणि लेखिका आहेत ज्यांनी विशेषतः महाराष्ट्रातील आदिवासी पट्ट्यांमध्ये बाल कल्याण आणि महिला विकासाच्या क्षेत्रात सक्रियपणे काम केले. 25 वर्षांहून अधिक काळ सुमन यांनी अनेक प्रकल्प सुरू केलेत आणि त्यांची अंमलबजावणी केली आहे आणि बाल आरोग्य सेवा, महिलांचे हक्क आणि कौटुंबिक समुपदेशन यासारख्या विविध पैलूंवर महिलांना मार्गदर्शन सुद्धा केले. त्यांच्या अश्या विलक्षण कार्याचा गौरव म्हणून, सुमन यांना अनेक संस्थांकडून सन्मानित करण्यात आले, ज्यात महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारचा राज्यस्तरीय पुरस्कार, महिला आणि बालविकास क्षेत्रात समाजात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल दिला जाणारा "अहिल्यादेवी होळकर पुरस्कार" याचा समावेश आहे. फक्त इतकेच नव्हे तर महिला, आदिवासी, समाजशास्त्रीय विषयांवर अनेक पुस्तकेही त्यांनी लिहिली आणि ती प्रकाशित देखील केली. जी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सादर केली आहेत. सुमन मुठे यांच्या सारख्या स्त्रिया केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण जगाला एक जगण्याची प्रेरणा देतात.
- मेधा पाटकर
 

Source: rebellionvoice
१ डिसेंबर १९५४ मध्ये जन्म झालेल्या, मेधा पाटकर या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत ज्या आदिवासी, दलित, शेतकरी, मजूर आणि भारतातील अन्यायाचा सामना करणार्या महिलांनी उपस्थित केलेल्या विविध महत्त्वाच्या राजकीय आणि आर्थिक प्रश्नांवर काम करतात. पाटकर या मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांतील नर्मदा बचाव आंदोलन नावाच्या 32 वर्षांच्या लोक चळवळीचे संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. मेधा यांची हीच संस्था, सरदार सरोवर धरण प्रकल्पाशी संबंधित धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या लोकांसाठी न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे, विशेषत: त्या लोकांसाठी ज्यांची घरे पाण्याखाली जाणार आहेत परंतु त्यांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही.
शेकडो पुरोगामी लोकांच्या संघटनांची युती असलेल्या नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेंट्स (एनएपीएम) च्या संस्थापकांपैकी देखील त्या एक आहेत. आणि या सगळ्या कार्याव्यतिरिक्त, पाटकर धरणांवर सखोल संशोधन करणाऱ्या जागतिक आयोगाच्या आयुक्त सुद्धा होत्या. पर्यावरणाशी निगडित, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आणि जागतिक स्तरावर मोठ्या धरणांच्या विकासाचे परिणाम जाणून घेण्यासाठी आणि त्यांचे आणखी पर्यायी विकल्प शोधण्यासाठी, त्या आयोगाच्या आयुक्त म्हणून देखील कार्यरत होत्या. आणि नंतर नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेंट्सच्या संयोजक होत्या आणि आता NAPM च्या सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. NAPM च्या बॅनरखाली, पाटकर यांनी असमानता, अ-स्थायीता, विस्थापन आणि अन्यायाविरुद्ध भारतभरातील विविध जनसंघर्षांमध्ये भाग घेतला आणि खंबीर पणे पाठिंबा सुद्धा दिला. भूसंपादन, असंघटित क्षेत्रातील कामगार, फेरीवाले, झोपडपट्टी-वासी आणि वन-निवासी आदिवासींसह विविध राष्ट्रीय धोरणे आणि अधिनियमे सुरू केलीत आणि अश्याच काम करणाऱ्या असंख्य टीम्स आणि पॅनल्सचा त्या एक अविभाज्य भाग आहे. माणसाने पवित्र मनाने जर काही करण्याचं ठरवलं आणि ते देखील समाजाभिमुख, तर त्याला दैवी साथ ही असतेच आणि ते कार्य संपुष्टाला नक्कीच जातं याचं जिवंत उदाहरण म्हणजे मेधा पाटकर.
- सिंधुताई सपकाळ
 

Source: sightmag
सिंधुताई सपकाळ - अनाथांची आई आणि संपूर्ण जगाची माई. आजच्या पिढीने जर आयुष्य जगण्यासाठी आपलं प्रेरणास्थान कोणाला मानावं, तर ते म्हणजे सिंधुताई सपकाळ. ज्य स्त्रीने आयुष्याला जगणं शिकवलं ती स्त्री म्हणजे सिंधुताई सपकाळ, ज्या स्त्रीने नशिबाला हारवलं ती स्त्री म्हणजे सिंधुताई सपकाळ, ज्या स्त्रीने जगाला लढणं शिकवलं, ती स्त्री म्हणजे सिंधुताई सपकाळ. सिंधुताईंनी आपले संपूर्ण आयुष्य अनाथांसाठी वाहून घेतले, ज्यामुळेच सिंधुताईना माई म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. माईंनी १०५० हून अधिक अनाथ मुलांचे पालनपोषण केले आहे. आजमितीस, सिंधुताईंचे २०० हून अधिक जावई आणि जवळ जवळ ४० सुना असा भव्य परिवार आहे.
माईने दत्तक घेतलेली अनेक मुले सुशिक्षित वकील, व्याख्याते आहेत आणि त्यांचा पोटच्या मुलीसह काही मुले स्वतःचे स्वतंत्र अनाथालय चालवत आहेत. माईंच्या अनेक मुलांपैकी एक मुलगा त्यांच्याच आयुष्यावर पीएच.डी करत आहे. माईंच्या अश्या अलौकिक समर्पण आणि कार्यासाठी त्यांना 750 हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्काराची रक्कम सुद्धा सिंधुताईंनी आपल्या अनाथ मुलांसाठी घर बनवण्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी वापरली. माईंच्या समर्पण आणि त्यागामुळे आज या मुलांची स्वतःची इमारत आहे जी पुण्याच्या जवळ, जिल्हा मांजरी येथे स्थित आहे. तिथे संगणक कक्ष, सांस्कृतिक उपक्रमांसाठी मोठा हॉल, सोलर सिस्टीम, वॉटर फिल्टर, लायब्ररी, स्टडी रूम, आणि सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध आहे. माई आपल्या मुलांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि पुनर्वसन याबरोबरच उत्तम राहणीमान देण्यासाठी सतत प्रयत्नशील होत्या.
वयाच्या ७० व्या वर्षी त्यांचा नवरा माफी मागून माईंकडे परत आला. "पण आता ती फक्त आई आहे" असे सांगून सिंधुताईंनी त्यांच्याच नवऱ्याला आपले मूल म्हणून स्वीकारले! जर तुम्ही त्यांच्या आश्रमाला भेट दिली असेल तर त्या अभिमानाने आणि अतिशय प्रेमाने त्यांचा सर्वात मोठा मुलगा म्हणून ओळख करून द्यायचा! व्यक्तिशः, सिंधुताई या ऊर्जा आणि प्रेरणेचा अथांग स्त्रोत म्हणून समोर यायच्या, ज्यामध्ये कोणत्याही नकारात्मक भावना किंवा वाईट इच्छा असणं शक्यच नाही. परंतु त्या आज आपल्यामध्ये नाहीत याच वर्षी ३ जानेवारीला पुण्यात माईंनी आपला शेवटचा श्वास घेतला. शारीरिक रित्या जरी माई आज आपल्यात नसल्या तरी त्यांनी केलेलं कार्य हे येत्या १०० वर्षांपर्यंत आपल्या आणि येणाऱ्या पिढ्यांना देखील असंच प्रेरित करत राहील!
Write, Record and Answer! Consume Unlimited Content! All you need to do is sign in and its absolutely free!
Continue with one click!!By signing up, you agree to our Terms and Conditions and Privacy Policy.
                

