स्ट्रेच मार्क्ससाठी नैसर्गिक उपचार.

11 minute
Read



Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

(You can read this Blog in English here)

स्ट्रेच मार्क्स हा एक सामान्य आजार आहे जो पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होतो. ते लवकर जात नाहीत आणि लोकांचा आत्मविश्वास कमी करतात. गर्भधारणेमुळे असो किंवा अनपेक्षित वजन वाढण्यामुळे असो, हा एक कॉस्मेटिक आजार आहे जो कंबर, मांडी, पाठीचा खालचा भाग, स्तन, हात आणि नितंबांवर दिसू शकतो.

स्ट्रेच मार्क्स आपल्या त्वचेवर समांतर रेषांची मालिका म्हणून दिसू लागतात. या रेषा आपल्या नियमित त्वचेपेक्षा रंग आणि पोत याबाबतीत वेगळ्या असतात, त्यांचा रंग जांभळ्यापासून ते भडक गुलाबी ते फिकट राखाडीपर्यंत असा असू शकतो. जेव्हा त्वचेचा ‘डर्मल’ थर अनपेक्षित ताणला जातो तेव्हा ते उद्भवतात, जसे की गर्भधारणेदरम्यान. 'डर्मिस' मध्ये मजबूत, जोडलेले तंतू असतात जे आपले शरीर वाढत असताना आपल्या त्वचेचा विस्तार करण्यास अनुमती देतात.

वेगाने वजन वाढल्यामुळे त्वचा जास्त प्रमाणात ताणली जाते आणि हे तंतू तुटतात, परिणामी स्ट्रेच मार्क्स उद्भवतात. जेव्हा ‘डर्मिस’ फाटते, तेव्हा त्वचेच्या खाली असलेल्या रक्तवाहिन्या दिसू लागतात, ज्यामुळे स्ट्रेच मार्क्स प्रथम लाल किंवा जांभळे दिसतात. जेव्हा रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि या खुणा चंदेरी-पांढऱ्या रंगांच्या बनतात तेव्हा आपल्या त्वचेच्या खालची फिकट रंगाची चरबी दृश्यमान होऊ लागते. स्ट्रेच मार्क्स हे आजारपणाचे लक्षण नसले तरी, विविध प्रकारच्या नैसर्गिक उपचारांचा वापर करून ते फिके/ धूसर केले जाऊ शकतात आणि हटवले जाऊ शकतात.

स्ट्रेच मार्क्सची अनेक कारणे आहेत.

1. गर्भधारणेदरम्यान- बहुतेक गर्भवती महिलांमध्ये स्ट्रेच मार्क्स दिसतात कारण त्वचेचे तंतू मऊ होतात आणि वाढत्या बाळाला सामावून घेण्यासाठी ताणतात. बाळ वाढत असताना पोट, मांडी आणि स्तनांवर स्ट्रेच मार्क्स तयार होतात, याचा परिणाम म्हणून सतत टगिंग आणि स्ट्रेचिंग होते.

2. किशोरावस्थेमध्ये- तारुण्यात, मुले भरभर वाढत असतात आणि त्यांचे वजन पटकन वाढू किंवा कमी होऊ शकते. नितंब, मांडी आणि स्तनांवर अचानक त्वचा संकुचित झाल्यामुळे आणि ताणल्यामुळे स्ट्रेच मार्क्स उद्भवतात.

3. वजन वाढणं- जेव्हा वजन झपाट्याने वाढते त्यामुळे त्वचा वेगाने ताणली जाते तेव्हा स्ट्रेच मार्क्स येतात. तुमचे वजन बदलत राहत असते, त्यामुळे तुम्ही डाएट वर असताना स्ट्रेच मार्क्स दिसू शकतात. त्यामुळे त्वचेवर ताण येऊ नये म्हणून हळूहळू वजन कमी करणं श्रेयस्कर ठरतं.

4. कॉर्टिकोस्टेरॉईड्स (एक प्रकारचा कॉर्टिकोस्टेरॉईड) -  त्वचेचे काही परिस्थितीवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॉर्टिकोस्टेरॉईड क्रीम, लोशन आणि गोळ्या त्वचेतील कोलॅजनची पातळी कमी करून स्ट्रेच मार्क्स निर्माण करू शकतात. यामुळे त्वचेची ताणण्याची क्षमता कमी होते, स्ट्रेच मार्क्सची शक्यता वाढते.

5. अनुवंशशास्त्र- जर तुमच्या पालकांना स्ट्रेच मार्क्स असतील तर तुम्हाला स्ट्रेच मार्क्स असण्याची शक्यता जास्त आहे.

6. आरोग्याच्या समस्या- कुशिंग डिझीज, मार्फन सिंड्रोम, एह्लर्स-डॅनलॉस सिंड्रोम आणि इतर अड्रीनल ग्रंथीचे विकार हे स्ट्रेच मार्क्स निर्माण करणाऱ्या आजारांमध्ये समाविष्ट आहेत. कुशिंग सिंड्रोममध्ये शरीर खूप जास्त कॉर्टिसॉल तयार करते, परिणामी या खुणा तयार होतात.

दरम्यान, सदोष जनुकामुळे मार्फान सिंड्रोम होतो, ज्यामुळे शरीरातील त्वचा आणि संयोजी ऊतक पातळ आणि ठिसूळ होतात, ज्यामुळे स्ट्रेच मार्क्सची शक्यता वाढते.

7. स्नायूंचा विकास- स्ट्रेच मार्क्स ही बॉडीबिल्डर्समध्ये एक सामान्य समस्या आहे. स्ट्रेच मार्क्स स्नायूंच्या वेगवान वाढीमुळे होतात आणि अशा काही विशिष्ट परिस्थितीत स्नायूंच्या वाढीस गती देण्यासाठी अॅनाबॉलिक औषधांचा वापर केला जातो.

स्ट्रेच मार्क्सचे प्रकार

1. लालसर तपकिरी स्ट्रेच मार्क्स- हे ‘स्ट्रीए रुब्रा’ किंवा लालसर किंवा जांभळट स्ट्रेच मार्क्स नवेनवे असतात आणि सुरुवातीला लालसर किंवा जांभळट वाटतात. जेव्हा त्वचेचा डर्मल थर ताणला जातो तेव्हा रक्तवाहिन्या उघड्या पडतात. या टप्प्यावर, आपल्याला स्ट्रेच मार्क्सच्या आसपास बरीच खाज सुटणे जाणवू शकते. लाल स्ट्रेच मार्क्स ताजेच असल्याने ते लवकर हटवणे शक्य असते.

2. पांढऱ्या रंगाचे स्ट्रेच मार्क्स - हे पांढऱ्या किंवा चंदेरी रंगाचे असतात आणि हे सर्वात हट्टी डाग असतात. त्यांना ‘अल्बा स्ट्रिए’ म्हणून देखील ओळखले जाते. जेव्हा रक्तवाहिन्या कोसळतात, त्वचेच्या खाली चरबी उघड करतात तेव्हा त्वचेवर लहान भेगा विकसित होतात. पांढरे स्ट्रेच मार्क्स अधिक चिवट असल्याने ते हटवण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.

घरच्या घरी स्ट्रेच मार्क्सवर उपचार

1. सुरुवातीला व्हिटॅमिन ई पूरक आर्गन ऑइल - आर्गन ऑइल त्वचेची लवचिकता वाढवते. स्ट्रेच मार्क्सवर उपचार करण्यासाठी याचा वापर केल्यास फाटलेल्या ऊती बऱ्या होण्यास आणि कालांतराने चट्टे कमी होण्यास मदत होते.

2. लिंबाचा रस- लिंबाचा रस त्याच्या अंगभूत ब्लीचिंगच्या गुणधर्मांमुळे स्ट्रेच मार्क्सची दृश्यमानता प्रभावीपणे कमी करतो. परिणाम दिसून येण्यासाठी दररोज ताजा लिंबाचा रस वापरा, किंवा आपल्या डागांवर फक्त लिंबाची चिरलेली काप लावा.

3. अंड्याचा पांढरा भाग- अंड्याचा पांढरा भाग प्रथिने आणि अमिनो आम्लांनी समृद्ध असतो, ज्यामुळे ते त्वचेसाठी सुपरफूड बनते. अंड्याचा पांढरा भाग स्ट्रेच मार्क्सवर लावल्यावर त्वचा घट्ट करण्यात आणि स्ट्रेच मार्क्स हलके करण्यात मदत करतो.

4. बटाट्यांपासून मिळणारा रस - बटाटे, ज्यात स्टार्च आणि इतर त्वचेचा रंग हलका करणारे एन्झाइम असतात, ते सामान्यत: डोळ्याखालील काळी वर्तुळे, डाग आणि इतर त्रुटी नाहीश्या करण्यासाठी वापरले जातात. हा रस त्वचेला ब्लीच करतो आणि दररोज लावल्यास स्ट्रेच मार्क्सचे स्वरूप यशस्वीरीत्या कमी करतो.

5. शुक्रोज एक साखर आहे. - साखर, ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस एकत्र करून स्क्रब तयार करा. स्ट्रेच मार्क्सवर लावल्यानंतर ते दहा मिनिटे चोळावे. कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

6. ऑलिव्ह ऑईल (एक्स्ट्रा व्हर्जिन) - ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक द्रव्यांचे प्रमाण जास्त असते जे त्वचेचे झालेले नुकसान भरून काढण्यास मदत करतात आणि त्यात मॉइश्चरायझिंगचे बरेच गुणधर्म असतात. कोल्ड-प्रेस्ड ऑलिव्ह ऑईलचा वापर स्ट्रेच मार्क्स कमी करण्यात मदत करू शकतो.

7. एरंडेल तेल- एरंडेल तेल थेट स्ट्रेच मार्क्सवर लावा आणि गोलाकार गतीमध्ये 15-20 मिनिटे मालिश करा. मालिश केल्यानंतर, पातळ सुती कापडाने तो भाग झाकून ठेवा आणि हीटिंग पॅडने त्या भागाला उष्णता द्या. याचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तुम्ही एक महिन्यात शक्य तितक्या वेळा हे करा.

8. अॅलोव्हेरा जेल- कोरफडीच्या पानाचे बाहेरील आवरण काढा आणि आतला चिकट जेलसारखा पदार्थ पानाच्या आतून काढून घ्या. अॅलोव्हेरा जेल स्ट्रेच मार्क्सवर लावा आणि 2-3 तासांनंतर पाण्याने धुवा.

9. जर्दाळू - बिया काढून टाकल्यानंतर 2-3 जर्दाळू गुळगुळीत लगद्यासारखे बारीक करा. स्ट्रेच मार्क्सवर लगेच पेस्ट लावा. प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 20 मिनिटे जाऊ द्या. त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

10. ब्लॅक टी - ब्लॅक टीमध्ये व्हिटॅमिन बी 12 सारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजांचे प्रमाण जास्त असते, जे त्वचेच्या रंगद्रव्याचे नियमन करण्यास मदत करते. स्ट्रेच मार्क्सवर उपचार करण्यासाठी दोन चमचे ब्लॅक टी आणि मीठ घालून उकळवा. हे मिश्रण थंड झाल्यानंतर मार्क्सवर लावा आणि ते जाईपर्यंत नियमितपणे लावत राहा.

आहारातून घेण्याचे पूरक पदार्थ

1. पाणी

दररोज ८-१० ग्लास पाणी प्यायल्यास त्वचेला मदत होते. हे त्वचेची लवचिकता पुन्हा मिळवून देण्यास मदत करते आणि त्वचा गुळगुळीत आणि रेशमी ठेवते. याचा परिणाम म्हणून स्ट्रेच मार्क्स कमी होतात.

2. व्हिटॅमिन सी- अस्कॉर्बिक अॅसिड

बेरी, कच्चा कोबी, लिंबूवर्गीय फळे, किवी फळ, खरबूज, मटार, मिरपूड, ब्रॉकली, अननस, पालक, टोमॅटो आणि शलजम या सर्वांमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. हे एक अँटिऑक्सिडंट आहे जे प्रदूषण आणि आपल्या शरीरात असलेल्या मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करते. तुम्हाला पुरेसे व्हिटॅमिन सी मिळाल्यास तुमच्या त्वचेवरील चट्टे लवकर बरे होतील.

  1. व्हिटॅमिन ई एक अँटिऑक्सिडंट आहे.

व्हिटॅमिन ई एक अँटिऑक्सिडंट आहे जे मुक्त (फ्री) रॅडिकल्सला तटस्थ करून त्वचेचे संरक्षण आणि पोषण दोन्ही करते. बदाम, भोपळा आणि तीळ यांसारख्या कच्च्या बिया, स्विस शार्डस, हेझलनट्स, पाइन नट, पालक, आवकाडो, ब्रॉकली, पार्सली, पपई आणि ऑलिव्ह या सर्वांमध्ये व्हिटॅमिन ई चे प्रमाण जास्त असते. हा आहार नियमितपणे घेतल्याने स्ट्रेच मार्क्स टाळता येतात.

  1. फॅटी अॅसिड (ओमेगा -3)

ओमेगा-३ फॅटी अॅसिडमुळे त्वचा अधिक कोमल होण्यासही मदत होते. स्ट्रेच मार्क्स टाळण्यास मदत करू शकणाऱ्या काही पदार्थांमध्ये फ्लॅक्स सीड (अळशीच्या बिया), चिया सीड, सॅमन मासा, सार्डिन मासा, कॉड माशाचे यकृत, अक्रोड, सोयाबीन, गोमांस, टोफू, कोळंबी आणि कॉलीफ्लॉवर यांचा समावेश आहे.

बॅनरमधील इमेजचा स्रोत: टाइम्स ऑफ इंडिया

अनुवाद: अन्योक्ती वाडेकर  Translated by Anyokti Wadekar

 

 

 

 

 

 

Logged in user's profile picture