अश्या पद्धतीने घ्या उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी!

8 minute
Read



Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

उन्हाच्या वाढता तापमानामुळे आपल्या त्वचेवर देखील बदल दिसू शकतात. दिवसभर अधिक उष्णतेमुळे आणि आर्द्रतेमुळे, तुमची त्वचा अधिक संरक्षणासाठी ओरडू लागते - त्या त्रासदायक पुरळ आणि सनबर्नच्या प्रदर्शनापासून ते हट्टी टॅन आणि पुरळांपर्यंत या सगळ्याच गोष्टी पासून तुम्ही मुक्त होऊ शकता. या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहे, काही अश्याच टिप्स ज्यामुळे अगदी तापत्या उन्हाळ्यात देखील तुम्ही तुमच्या त्वचेचं संरक्षण करू शकाल.

उन्हाळा मध्ये तुमच्या त्वचेवर नेमका काय फरक पडतो?

ज्या प्रमाणे उन्हाचे तापमान वाढत जाते त्या प्रमाणे तुमच्या त्वचेत तुम्हाला बदल जाणवू लागतील. तुमची त्वचा स्वतःहून शरीरातील तेल नैसर्गिकरित्या तयार करते पण उन्हाळामध्ये याचा प्रमाण अधिक असतं आणि हे तेल त्वचेच्या सगळ्यात वरच्या लेअर वर येऊन अडकतं आणि याच्याचमुळे उन्हाळ्यात चिकटपणा आणि तेलकटपणा याचा त्रास अधिक होतो.

तुमच्या त्वचेला सूर्याच्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी त्वचा स्वतःहूनच मेलेनिन चे उत्पादन वाढवते. इतर काही समस्यांमध्ये जर उद्धरण घ्यायचं झालं तर त्वचेला खाज सुटणे, काटेरी उष्णता, उन्हात खासकरून जळजळ होणे किंबहुना अजून बऱ्याच गोष्टी होऊ शकतात.

मग आता प्रश्न असा उभा राहतो की इतक्या तापत्या उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी नेमकी कुठल्या प्रकारे घेऊ शकू?

  1. अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी वापरा फेस वॉश

उन्हाळ्यात तेलकट त्वचा अधिक तेलकट होण्याची शक्यता असते. तुमच्या त्वचेला फेस वॉशचा जो प्रकार अनुकूल असेल असा वापरा जो चेहेऱ्याला खोलवर जाऊन स्वच्छ करू शकेल. ज्यांची त्वचा कोरडी आहे, अश्या लोकांना, ज्या क्लिंझर मध्ये फोमिंग नसले अश्या याची आवश्यकता असते. त्यांनी असे क्लीन्सर वापरावे जे pH संतुलित असतील, सौम्य असतील आणि सोबतच अल्कोहोल-मुक्त असतील.

  1. चांगल्या त्वचे करीत उत्तम दिनचर्या निवडा

त्वचेची काळजी घ्या आणि त्याचे नियमित रीतीने पालन करा. साधारणतः आपण जेल आधारित गोष्टी घेण्याऐवजी क्रीम आधारित गोष्टींना अधिक लक्ष देतो, पण असं अजिबात करू नका. तुमच्या त्वचेच्या प्रकारावर आधारित म्हणजे ती कोरडी असेल किंवा तेलकट असेल, त्यावर आधारित त्वचेसाठी प्रॉडक्ट्स निवडा. 

असे केल्याने त्वचा स्वच्छ राहण्यास आणि ताजीतवानी दिसण्यास मदत होईल.

Source: pixabay.com

 

  1. तुमच्या स्किन केअर रेजिममध्ये अँटिऑक्सिडंट्सचा समावेश करा

अँटिऑक्सिडंट सीरम तुमच्या त्वचेला हायड्रेट करण्यासाठी खूप अप्रतिम काम करतात. याव्यतिरिक्त तुमच्या त्वचेला पर्यावरणातील असलेल्या धूळ माती पासून होणाऱ्या नुकसानीपासून देखील वाचवतात, कोलेजन वाढवण्यासाठी मदत करतात. उन्हाळ्यात आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपण आपल्या स्किनकेअर रुटीनमध्ये न विसूरता एखाद्या चांगल्या अँटिऑक्सिडंट सीरमचा समावेश अवश्य करावा.

 

  1. तुमच्या त्वचेला नेहेमी हायड्रेटेड ठेवा

उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेटेड ठेवणे अत्यंत महत्वाचे असते. अगदी रात्री झोपतांना सुद्धा. आपण बरेच वेळा हे विसरून जातो की रात्री देखील आपली त्वचा हैड्रेटेड असली पाहिजे. यासाठी तुम्ही झोपत्यांना अगदी खास हायड्रेशनसाठी एखादी चांगला फेस मास्क वापरू शकता जो हायड्रेटिंग मध्ये त्वचेला मदत करेल.

Source: pixabay.com

 

  1. सनस्क्रीन लावायला विसरू नका

सूर्यातील किरणं UV-Bआणि त्याच बरोबरीने UV-A  त्वचेसाठी प्रचंड प्रमाणात कठोर साबित होऊ शकतात. तुम्हाला टॅन देण्यासोबतच, बारीक रेषा, वृद्धत्व, सुरकुत्या, आणि डाग सुद्धा देऊ शकतात. SPF 30-50 सह उत्तम सनस्क्रीन उन्हाळ्याच्या महिन्यांसाठी आवश्यक आहे, तुम्ही जरी अधिक वेळा घरीच असाल तरीही. तुम्ही पोहण्याकरिता जात असल्यास, तुम्हाला सनस्क्रीन लावण्याची गरज अगदी अनिवार्य होऊन जाते.

Source: pixabay.com

 

  1. उत्तम टोनरचा वापरा करा.

एक चांगला टोनर मोकळे छिद्र बंद करण्यात प्रभावी ठरतो. चेहऱ्यावरील टी-झोनवर अधिकाधिक सेबेशियस ग्रंथी सापडतात. या छिद्रांना तेल व घाम अडकण्यापासून रोखण्यासाठी, काकडी व त्याच्या बरोबरीने कोरफडवर आधारित असलेले टोनर तुमची वापरू शकता.

 

  1. त्वचेला मॉइश्चरायझ ठेवा

मॉइश्चरायझर हे उन्हाळ्यात तुमच्या त्वचेच्या संरक्षणाकरिता अत्यंत आवश्यक आहे. ज्या प्रकारची तुमची त्वचा आहे, म्हणजे कोरडी किंवा तेलकट, त्याला लक्षात घेऊनच तुम्हाला हवा तो आणि हवा तास ग्रीसी किंवा नॉन-ग्रीसी फॉर्म्युला निवडण्यास तुम्ही स्वतंत्र आहात. परंतु हे करत असतांना सुद्धा एक लक्षात ठेवायला हवं की त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए या सारखे अँटिऑक्सिडंट्ससारखे घटक आहेत.

Source: pixabay.com

 

  1. पाय डोळे आणि त्याच सोबत नाक याला सोडू नका.

डोळ्यांचे संरक्षण सूर्याच्या किरणांपासून करण्याकरिता दरवेळी सनग्लासेसचा वापर करा. इतकेच नव्हे तर डोळ्याच्या खाली देखील मॉइस्चरायझिंग जेलचा० वापर करा. आपल्या पायावर सुद्धा सनस्क्रीन आणि त्याच सोबत मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

 

  1. अधिक पाणी आणि फळांचे रस प्या

उन्हाळ्यात त्वचेसाठी फळे प्रचंड फायदेशीर ठरतात. उन्हाळ्यामध्ये न विसरता दिवसाला जवळपास तीन लिटर पाणी हे अवश्य पिल्या गेलेच पाहिजे . टरबूज त्याचसोबत नारळ पाणी आणि काही इतर फळांचे ताजे रस हे हायड्रेटेड राहण्यासाठी उत्तम काम करतात. आपल्या रोजच्या जेवणात ताक, दही यांचा अवश्य समावेश करा.

Source: pixabay.com

 

  1. हंगामी (सीझन्ड) फळ, भाज्या अवश्य खा

पालेभाज्यांचा आणि सॅलड्सचा तुमच्या रोजच्या खाण्यात समावेश करा. याचं कारण म्हणजे शरीराला या गोष्टी आतून अगदी थंड आणि शीतल ठेवण्यास मदतगार ठरतात. मुळात कुठली ही फळं आपल्या सेहतसाठी चांगलीच असतात पण उन्हाळ्यात मुख्यतः रस असलेली फळ निवडा, जसे की डांगर, टरबूज इत्यादी.

 

  1. ज्या पेयांमध्ये साखर प्रमुख स्वरूपात आहे ती पेय टाळा.

शरीरात साखरयुक्त पेय कुठल्याही प्रकारचे मूल्य आहाराला जोडत नाहीत. या उलट तुमच्या शरीराला हानी पोहोचवण्यचं काम ही पेय अधिक करतात. त्यामुळे कुठल्याही परस्थितीत कोला पिण्या ऐवजी निंबू पाणी प्या.

Source: pixabay.com

 

  1. तुमच्या शरीराला सहजतेने श्वास घेता येईल असे कपडे घाला

उन्हाळ्यात घालण्यासाठी कापसा पेक्षा उत्तम फॅब्रिक असूच शकत नाही. हलके आणि सैल असलेले कपडे घालण्याचा प्रयत्न करा. सिंथेटिक कपडे किंवा अगदी घट्ट कपडे शक्यतोर टाळा.

Logged in user's profile picture