पावसाळ्यात घ्या आपली आणि आपल्या परिवाराची या प्रकारे काळजी!
8 minuteRead
मधुनीच वीज थरथरते
क्षण प्राण उजळुनी विरते
करी अधिक गहन अंधारा रे
बाहेर बरसती धारा रे
पाऊस आला की नकळत का होई ना पण आपल्या मुखी मंगेश पाडगांवकर यांनी लिहिलेल्या या कवितेचे हे शब्दं उद्गारले जातात. ग्रीष्म ऋतू नंतर मातीची आणि माणसांची सुद्धा काहिली होत असतांना, अगदी सुखावणारा क्षण म्हणजे वर्षा ऋतूचं आगमन. अगदी लहान मुलांपासून तर वयस्कर आणि प्रौढांपर्यंत पावसाळा कोणाला नाही आवडत? पावसामुळे निसर्ग अगदी हिरवाकंच होतो, नद्या नाले तुडुंब भरून जातात, त्यासोबतच आपल्या खायला अन्न धान्य मिळतं, शेतीत पीक पाणी अगदी व्यवस्थित होतं ही सुद्धा पावसाचीच कृपा!
निसर्गात प्रत्येक निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे, किंबहुना एकूणच सगळ्याच गोष्टींचे काही फायदे तर काही तोटे असतात. त्याच प्रमाणे पावसाळामध्ये आपल्या आपल्या प्रकृतीची काळजी अधिक प्रमाणात घ्यावी लगते. अगदी खाण्या पिण्या पासून तर मच्छरांपासून आपला बचाव करे पर्यंत. या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहे, की पावसाळा आल्या नंतर आपण आपल्या स्वतःची आणि त्याच सोबत आपल्या परिवाराची काळजी अगदी उत्तम रित्या कशी घेऊ शकतो.
Source: pixabay.com
पावसाळ्यात वीज जाणे ही सामान्य समस्या आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिकांनी किंबहुना प्रत्येकानेच अंधारात घरी एकटे असताना किंवा सहकुटुंब असताना अशा प्रसंगात पूर्णपणे तयार राहणे उत्तम. अंधार दूर करण्याकरिता फ्लॅशलाइट, सौरऊर्जेवर चालणारा प्रकाश किंवा टॉर्च किंवा मेणबत्ती या सारख्या गोष्टी घरात असू द्या. कारण या सगळ्या गोष्टींची तुम्हाला कधी गरज पडेल हे तुम्हाला माहीत नाही.
Source: pixabay.com
उच्च आर्द्रता त्वरीत संक्रमण आणि जंतूंचा प्रसार वाढवू शकते. विशेषत: वृद्ध लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पावसाळ्यात त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता असते. आजार, श्वसनाचे विकार, इन्फ्लूएन्झा, कोरडा खोकला, सर्दी, फ्लू, व्हायरल इन्फेक्शन, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, पाचक समस्या, अल्सर, ताप आणि थकवा – या पैकी काही पण जाणवल्यास मुख्य लक्षणांकडे लक्ष द्या आणि तुम्हाला अस्वस्थ वाटत असल्यास वैद्यकीय मदत घ्या. कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या फॅमिली डॉक्टरांना स्पीड डायलवर ठेवणे चांगले. तुमची रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या सप्लिमेंट्सचा साठा देखील करू शकता. गर्दीची ठिकाणे टाळणे देखील चांगले आहे कारण तुम्हाला संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते आणि तुम्हाला ते कळण्यापूर्वीच संसर्ग पसरू शकतो आणि त्यातून सध्या कोव्हीड सारखा आजार फोफावला असताना, ही काळजी घेणं अधिक महत्वाची ठरते.
Source: pixabay.com
पावसाळ्यात तुम्ही तुमच्या आहाराकडे अधिक लक्ष देणे अत्यावश्यक आहे. शक्यतो स्ट्रीट फूड टाळा आणि कच्च्या भाज्यांपासून दूर राहा. त्याऐवजी, पौष्टिक आहार ठेवा ज्यामध्ये शिजवलेल्या भाज्या, फळे, हर्बल चहा आणि यासारख्या गोष्टींचा समावेश असू शकतो. पावसाळ्यात जास्त पाणी प्यावेसे वाटणे सामान्य आहे, परंतु तुमची हायड्रेशन पातळी जास्त आहे याची खात्री करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. पावसाळ्याच्या दरम्यान पाणी सहज दूषित होऊ शकते, त्यामुळे तुमच्या घरी आणि कार्यालयात विश्वसनीय वॉटर प्युरिफायर बसवलं आहे याची खात्री करा पण त्या सोबतच ते नियमित पणे स्वच्छ करत राहा. जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा मिनरल वॉटर पिणे हे कधी ही चांगले.
Source: pixabay.com
पावसाळ्यामध्ये ओलसरपणा अगदी नैसर्गिक आणि सामान्य आहे. तथापि, ओलसर स्थितीमुळे बुरशीचा विकास होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला संक्रमण आणि विकार होण्याची शक्यता वाढते. श्वासोच्छवासाची समस्या असलेल्या लोकांना त्यांचा परिसर खूप ओलसर नसावा याची खात्री करण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात एअर प्युरिफायर बसवणे ही काळाची गरज आहे आहे. तुमच्या खोल्यांमध्ये पुरेसे वायुवीजन असल्याची खात्री करा आणि सुगंधित मेणबत्त्या पेटवून ओलसर वासापासून मुक्त व्हा. ते तुमच्या घराला सुगंधित तर करतीलच, पण वीज कपातीच्या वेळी तुमची साथही देतील!
Source: pixabay.com
तुम्ही घराबाहेर असाल किंवा घरात, तुमच्या कुटुंबाशी आणि मित्रमंडळींशी संपर्कात राहणे हे कधी पण उत्तम. एक दशकापूर्वी मुंबईवर आलेली आपत्ती आणि त्यामुळे झालेला विध्वंस आणि लोकांना झालेला त्रास आपल्या सर्वांना माहिती आहे. तुमच्याकडे स्पीड डायल, SOS आणि औषध स्मरणपत्रे यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या पूर्णतः कार्यक्षम आणि चार्ज केलेला मोबाइल फोन असला पाहिजे, जेणेकरून तुम्ही तुमच्या कुटुंबाला तुमचा ठावठिकाणा आणि गरजांबद्दल माहिती देऊ शकता.
Source: pixabay.com
पावसाळ्यात पावसाचा सामना करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्या जवळ असल्या पाहिजेत. जर तुमच्याकडे आधी पासून या गोष्टी नसतील तर स्वतःसाठी रेन-जॅकेट, रेनकोट आणि छत्री खरेदी करण्याची, पावसाळा आधीची वेळ म्हणजे सगळ्यात उत्तम वेळ आहे. बाहेरून घरी आल्यावर, प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ आणि बाहेर पडताना, तुमच्या छत्र्या हाताशी ठेवण्यासाठी तुमच्याकडे पाण्याने भिजल्या नंतर ही खराब न होणारे डोअरमॅट्स आणि टोपल्या आहेत याची खात्री करा. त्यासोबतच काही अतिरिक्त टॉवेल आणि उबदार ब्लँकेट जवळ असू द्या, कारण पावसाळ्यात हवामानामध्ये ओलावा असल्या कारणाने वापरलेले किंवा ओले कापड लवकर सुखात नाही.
Source: pixabay.com
तुम्ही काळजी न घेतल्यास तुम्ही संपूर्ण वर्षभर विकसित केलेली बाग काही मिनिटांत नष्ट होऊ शकते. तुमच्या बागेच्या मातीच्या पृष्ठभागावर आच्छादन लावा जेणेकरून अवांछित तणांची वाढ, जास्त धूप किंवा मातीचे शिडकाव होणार नाही. शक्य असल्यास, तुमची काही लाडकी झाडे घरामध्ये हलवा - विशेषत: ज्यांना दररोज जास्त पाणी पिण्याची गरज नाही. तुमच्या घरामध्ये झाडांच्या हिरव्यागार हवेमुळे कार्बन मोनॉक्साईडची हवा बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते आणि ताजे ऑक्सिजन तुमच्या संपूर्ण घरात प्रसारित होऊ शकते.
Write, Record and Answer! Consume Unlimited Content! All you need to do is sign in and its absolutely free!
Continue with one click!!By signing up, you agree to our Terms and Conditions and Privacy Policy.


