अश्या प्रकारे साजरी करा पर्यावरणपूरक दिवाळी!

7 minute
Read

Highlights या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत, नैसर्गिक दिवाळी किंवा इको फ्रेंडली दिवाळी, म्हणजे नक्की काय आणि ती कशी साजरी करावी!

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

मंडळी दिवाळी आता महिन्याभरात येत आहे. काय मग जोरदार तयारी सुरू आहे ना? घराची सजावट, कपड्यांची खरेदी, फराळाची तयारी आणि बरच काही. यादी मोठी आहे आणि अर्थातच उत्साह भरपुर आहे. दिवाळी साजरी करण्याची अनेक कारणे आहेत जसे, 14 वर्षांच्या वनवासातून राम, लक्षमण, सिताचे आयोध्येत परतणे आणि समुद्र मंथनातून लक्ष्मीचे प्रकट होणे. आणि अर्थातच , दरवर्षी संपूर्ण भारतात दिवाळी अगदी आनंदाने व जल्लोषाने साजरी केली जाते. दिवाळी साजरी करण्याचा एकच मार्ग नाही आणि आहे तोच मार्ग सर्वश्रेष्ठ आहे, असे ही काही नाही. प्रत्येक गोष्टीला दोन्ही बाजू असतात. परंतु पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर असताना, काही सामाजिक प्रथांचे पालन करणे ही आपल्या सध्याच्या काळातील महत्त्वाची बाब आहे.

दिवाळी म्हटलं की फटाके आलेच. फटाक्यांशिवाय लक्ष्मीपूजन नाहीच. 1001 ची माळ ही उडवली पाहिजे, ही रीतच आहे आपल्याकडे. पण ती माळ उडवल्यानंतर झालेला कचरा, पसरलेला धुर, होणारा भयंकर आवाज हे दुर्लक्षित राहतं. याचा पर्यावर्णाला किती नुकसान होतो, याचा आपण किती विचार करतो? सफाई कर्मचार्‍यांची दिवाळी तर झालेला कचरा साफ करण्यातच निघून जाते. शिवाय या सर्वत्र पसरलेल्या धुराचा व आवाजाचा त्रास होतो. लहान मुलांना, तान्ह्या  बाळांना व जेष्ठ नागरीकांंना देखील. 

fire crackers

Source: istockphoto.com

तेवढेच नाही तर त्या धुरामुळे दम्याचा त्रास होऊ शकतो. आजारी व्यक्तींना होणारा धुळीचा त्रास, पक्षी आणि प्राण्यांना होणारी जीवन हानी, याला पण कुठे ना कुठे आपणच जबाबदार असतो. बऱ्याचदा निष्काळजीपणामुळे किंवा अतिउत्साहामुळे एखाद्याच्या जीवावर ही फटाके बेतू शकतात. फटाके उडवताना पडलेली ठिणगे कपड्यांचा पेट घेऊ शकतात, झाडे जळू शकतात, विजेच्या तारा ही पेटू शकतात जे अतिशय धोकादायक आहे. फटाक्यांमध्ये अनेक घातक रसायने असतात ज्याने श्वास नलिकेचे आजार वाढू शकतात. या फटाक्यांमुळे झालेल्या प्रचंड आवाजामुळे कानाच्या पडद्याला देखील त्रास होऊ शकतो.

आता सण म्हटलं की रांगोळी तर आपण काढतोच. पण या रांगोळीत असणाऱ्या कृत्रिम रंगाचा आपल्या त्वचेवर फार घातक परिणाम होऊ शकतो. बऱ्याच लोकांना या रंगाची ऍलर्जी होऊ शकते व त्वचेचे आजार वाढू शकतात आणि चुकुन ही आपल्या पोटात ही जाऊ शकते कारण ही रंग काही लगेच निघत नाहीत. आपल्या सणांचा मूळ उद्देश हा दररोजचा ताण, थकवा विसरून थोडा ब्रेक घेणं आहे. पण त्यात ही एवढा धोका? हे एक कटू सत्य आहे ज्याला आपण बदलू शकतो.

जसं आपण पाणी विरहित होळी साजरी करतो, नैसर्गिक रंग वापरतो, शाडूच्या मातीचे गणपती बनवतो तसेच आपण नैसर्गिक दिवाळी सुद्धा साजरी करू शकतो. आता तुम्ही म्हणाल नैसर्गिक दिवाळी किंवा इको फ्रेंडली दिवाळी, म्हणजे नक्की काय आणि ती कशी साजरी करावी? चला बघूया!

diyas

Source: istockphoto.com

मुळात फटाके दिवाळीत अगदीच गरजेचे आहेत, असं काही नाही. आपण फटाके उडवणं शक्यतो टाळू शकतो. अगदी वाजवायचे असतील तर ध्वनी विरहित फटाके व कमी प्रदूषण करणारे फटाके बाजारात मिळतात जो एक उत्तम पर्याय असू शकतो. आणि गजबजलेल्या जागेत न उडवता मोकळ्या जागेवर उडवणे अधिक लाभदायक ठरेल.आवश्यक नसलेल्या गोष्टी विकत घेण्यास स्वतःला परावृत्त करा. घरात गोंधळ घालू नका. त्यामुळे उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचा वापर होतो. नैसर्गिक संसाधने नष्ट होतील.

दिवाळी म्हंटलं की पाहुणे आलेच आणि त्याच सोबत त्यांचं आदरातिथ्य ही न सांगता आलच. मात्र ह्यात देखील एका गोष्टीचिंब  शकतो ते म्हणजे अतिथींचे आदरातिथ्य करत असतांना, बायो-डिग्रेडेबल प्लेट किंवा केळीची पाने यांचा वापर करा. अशा प्रकारे तुम्ही या सणासुदीला पारंपारिक टच जोडू शकता. त्यासोबतच जोडीला जोड देण्यासाठी काच आणि प्लॅस्टिकऐवजी मातीचे ग्लास देखील तुम्ही वापरू शकता. ऑनलाइन स्टोअर ऐवजी तुमच्या जवळपासच्या स्थानिक दुकानातून तुमच्या सणासुदीच्या गरजांसाठी खरेदी करा. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला आधार मिळेल.

crackers

Source: pixabay.com

जुने ते सोने. सण साजरी करण्याच्या जुन्या  पद्धती अगदी उत्तम आहेत व त्याचा निसर्गाला त्रास नाही होत. जसं आधी हे कृत्रिम रंग नव्हते. तेव्हा रांगोळी ही घरी बनवलेल्या रंगांनी काढण्याची पद्धत होती. दक्षिण भारतात 'कोलम' रांगोळी ही प्रसिद्ध आहे जी तांदळाच्या पिठानी बनवली जाते. तसेच हळद-कुंकू आणि भाज्यांचा रसही वापरला जातो. आता तुम्ही म्हणाल एवढा वेळ कुठून आणणार? वेळ नसल्यास बाजारात मिळणारे 'ऑरगॅनिक' रंग ही वापरू शकतो. पण रंग थोडे जपूनच घ्या! फुलांचा ही वापर आपण रांगोळी काढण्यासाठी करू शकतो. त्याने रांगोळी आणखीनच सुंदर होईल आणि सोबत फुलांचा मोहक सुगंधही दरवळेल.

इलेक्ट्रिक लाईट च्या ऐवजी दिव्यांचा जास्तीत जास्त वापर नेहमी बरा! अशाने तुम्ही वीज ही वाचवू शकता!  शिवाय साध्या मातीचे दिवे वापरावेत. सजावटीसाठी मिळणारे दिवे दिसायला आकर्षक असले तरी, ते 'मेटॅलिक पेंट' नी रंगवले जातात जे तेलाच्या संपर्कात आल्यास वातावरण दूषित करतात. घराच्या सजावटीला लागणारे वस्तू जसं कंदील, दिवे घरीही बनवू शकतो. अशा ने आपली कलात्मकता वाढेल, वायफळ खर्च वाचेल आणि आपण काहीतरी नवीन केल्याचे आनंदही मिळेल. दिवाळीत आपण भरपूर गोड धोड खातो तर एकमेकांना भेटवस्तू म्हणून शक्यतो एखादी लाकडाची कलाकुसर असलेली भेटवस्तू किंवा ड्रायफ्रूट्स ही देऊ शकतो. अशाने तुमची दिवाळी हेल्दी आणि हॅप्पी होईल.

decoration of home with lights

Source: istockphoto.com

नैसर्गिक दिवाळी साजरी करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे या व अशा अनेक पद्धतींचा प्रचार करणे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ह्या पद्धती पोचवणे. या पद्धती अगदी नवीन आणि अवघड वाटत असतील कारण ते आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग नाही आहेत. ही आपली जबाबदारी आहे की याला आपल्या आयुष्याचा भाग बनवून सगळेच सण हे अगदी असेच साजरे करावे की ज्याने ना माणसांना ना निसर्गाला त्रास होईल.

चला करूया दिवाळी साजरी निसर्गाशी करू मैत्री!





Logged in user's profile picture




पर्यावरणपूरक दिवाळी कशी साजरी करावी?
<ol> <li>1.आपण फटाके उडवणं शक्यतो टाळू शकतो. अगदी वाजवायचे असतील तर ध्वनी विरहित फटाके व कमी प्रदूषण करणारे फटाके बाजारात मिळतात जो एक उत्तम पर्याय असू शकतो</li> <li>2.अतिथींचे आदरातिथ्य करत असतांना, बायो-डिग्रेडेबल प्लेट किंवा केळीची पाने यांचा वापर करा. अशा प्रकारे तुम्ही या सणासुदीला पारंपारिक टच जोडू शकता. </li> <li>3.फुलांचा ही वापर आपण रांगोळी काढण्यासाठी करू शकतो. त्याने रांगोळी आणखीनच सुंदर होईल आणि सोबत फुलांचा मोहक सुगंधही दरवळेल. </li> </ol>